शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचे प्रस्ताव

By admin | Updated: March 3, 2017 01:53 IST

सांडपाणी, डम्पिंग ग्राउंडचा तिढा सोडण्याची गरज

अकोला, दि.२ : राज्य व केंद्रातील भाजप सरकारने अकोला शहराचा ‘अमृत’ योजनेत समावेश केला. सर्वप्रथम पाणीपुरवठा योजनेला प्राधान्य देण्यात आले असून २५४ कोटींच्या डीपीआर (प्रकल्प अहवाल)मधून ११० कोटींचा निधी मनपाला प्राप्त झाला. सिमेंट रस्ते, एलईडी पथदिव्यांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला असला तरी अद्यापही सांडपाण्यासह डम्पिंग ग्राउंडची समस्या अकोलेकरांसमोर ‘आ’वासून उभी आहे. शहर विकासासाठी कोट्यवधींचे प्रस्ताव मंजूर होत असतानाच आता सत्ताधाऱ्यांनी विकास कामांप्रती ठोस व स्पष्ट धोरण निश्चित करण्याची गरज आहे. महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणूक निकालानंतर शहरातील राजकीय रणधुमाळी शमली असली तरी अद्यापही महापौर, उपमहापौरांची निवड झालेली नाही. एकूण ८० जागांपैकी भाजपला ४८ जागांवर विजय मिळाल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजपला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. असे असले तरी महापौर पदाचा दावेदार कोण, याचे पत्ते अद्यापही भाजपने उघडले नसल्याने अकोलेकरांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. तर नवनिर्वाचित नगरसेवकांना महापालिकेच्या सभागृहाचे वेध लागले आहेत. महापौर पदानंतर स्थायी समिती सभापती पद महत्त्वाचे मानले जाते. मुख्य सभागृहासह स्थायी समिती सभागृहाच्या कामकाजाला विशेष महत्त्व आहे. दोन्ही सभागृहात कोट्यवधींच्या विकास कामांचे प्रस्ताव असल्याने सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा कस लागतो तर विरोधक जीवाचे रान करतात, असे चित्र दिसून येते. शहरवासीयांना प्रामुख्याने दैनंदिन साफसफाई, पथदिवे, स्वच्छ रस्ते, नियमित पाणीपुरवठा अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त शहरातून निघणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यायी डम्पिंग ग्राउंडचा शोध घेणे, साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारणे, सांडपाण्याची समस्या निकाली काढणे आदी प्रमुख विषयांवर सभागृहात सविस्तर चर्चा होऊन निर्णय होणे अपेक्षित आहे. १६ सदस्यीय स्थायी समितीची रचना- सार्वत्रिक निवडणुकीनंतर एप्रिल महिन्यात पहिल्या सभेत महापालिका सदस्यांमधून १६ नगरसेवकांची स्थायी समितीच्या सदस्यपदी नेमणूक होते. -स्थायी समितीचे कामकाज चालविण्यासाठी मनपाच्या स्थायी समिती सभागृहात सभा आयोजित केली जाते. समितीची सभा आठवड्यातून एकदा आणि आवश्यक इतर वेळी घेण्याचे सभापतींना अधिकार आहेत. -प्रत्येक सभेच्या सूचनेमध्ये दिवस, वेळ आणि ठिकाण तसेच नगर सचिवांनी तयार केलेली कार्यक्रमपत्रिका सदस्यांना त्यांच्या निवासस्थानी पाठविणे बंधनकारक आहे.-पहिली सभा महापालिका आयुक्त निश्चित करतील त्या दिवशी घेतली जाते. स्थायी समितीच्या प्रत्येक सभेत सभापती हे अध्यक्षस्थानी असतात. सभापती अनुपस्थित राहिल्यास उपस्थित सदस्यांमधून सभेने त्या वेळेसाठी सभापती म्हणून निवडलेला एक सदस्य अध्यक्षस्थानी असतो.-प्रत्येक विषयावर चर्चा केल्यानंतर बहुमताने प्रस्ताव मंजूर करणे अपेक्षित आहे. काही सदस्यांनी विरोध दर्शवल्यास सभागृहात मतदान केले जाते. ज्या बाजूने बहुमत होईल, तो निर्णय मान्य केला जातो.