शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत खांब हटवण्यासाठी २४ कोटींचा प्रस्ताव

By admin | Updated: February 3, 2015 00:40 IST

विद्युत खांबांमुळे अकोला शहरातील रस्ते रुंदीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता.

आशिष गावंडे / अकोला: शहराच्या मुख्य २२ रस्त्यांवरील विद्युत खांब हटवण्यासाठी महावितरणने २४ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये भूमिगत विद्युत वाहिनीचा समावेश राहणार आहे. महावितरणच्यावतीच्या मुख्य अभियंत्यांनी हा प्रस्ताव कंपनीच्या मुंबईतील मुख्य कार्यालयाकडे सादर केल्याची माहिती महावितरणच्या शहर विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत डामसे यांनी सोमवारी दिली. महावितरणकडून हा प्रस्ताविक राज्याच्या नगरविकास विभागाकडे सादर केला जाणार आहे. शहरातील मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खड्डय़ांच्या समस्येला अकोलेकर अक्षरश: वैतागले आहेत. अतवृष्टीमुळे दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाने दीड वर्षांपूर्वी महापालिकेला १५ कोटींचा निधी मंजूर केला. हा निधी मनपाकडे जमा असताना प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात दंग आहे. १५ कोटींच्या निधीतून डांबरी १२, तर सिमेंट काँक्रीटच्या सहा रस्त्यांचे निर्माण होईल. यापूर्वी मनपा प्रशासनाने अनेकदा डांबरी रस्ते दुरुस्त केले; परंतु मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर विद्युत खांब कायम असल्याने रस्ता दुरुस्तीच्या कामासह वाहतुकीला होणारा अडथळा कायम आहे. मुख्य रस्त्यांलगत असलेले विद्युत खांब अपघातास कारणीभूत ठरतात. शिवाय रस्ता रुंदीकरण करताना मनपा प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागतो. यामधूनच महावितरणकडे मुख्य रस्त्यालगतचे विद्यूत खांब हटविण्याची मागणी सातत्याने मनपाने केली. त्यानुषंगाने महावितरणने शहरातील २२ रस्त्यांवरील विद्युत खांबांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर विद्युत खांब हटवून भूमिगत वीज वाहिनी टाकण्यासाठी किमान २४ कोटींचा खर्च प्रस्तावित करण्यात आला. हा प्रस्ताव मुख्य अभियंत्यांनी ह्यप्रकाशगडह्णला सादर केला आहे. महावितरणकडून हा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर केला जाणार आहे. नगरविकास विभागाकडे प्रस्ताव सादर झाल्यानंतर हा विभाग प्रस्तावावर कोणता निर्णय घेतात त्यावरच पुढील भूमिका निश्‍चित होईल.