शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी अर्जाच्या ‘स्वॉफ्टवेअर’मध्ये अडचणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2016 02:45 IST

नगरपालिका निवडणूकीसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज कसे भरणार?

अकोला, दि. २१- नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज 'ऑनलाइन' स्वीकारण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत ऑनलाइन उमेदवारी अर्जांसंदर्भात नगरपालिका अधिकारी-कर्मचार्‍यांना 'व्हिडिओ कॉन्फरन्स'द्वारे प्रशिक्षण दिले जात आहे; मात्र उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरण्याच्या ह्यसॉफ्टवेअरह्णमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सोमवारपासून सुरू होत असलेल्या उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेत उमेदवार उमेदवारी अर्ज 'ऑनलाइन' कसे भरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.नगरपालिका निवडणुकांसाठी २७ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २४ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज ह्यऑनलाइनह्ण भरावे लागणार आहेत. उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरल्यानंतर त्याची प्रत (प्रिंट) संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर करावी लागणार आहे. या पृष्ठभूमीवर ह्यऑनलाइनह्ण उमेदवारी अर्ज स्वीकरण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगामार्फत राज्यातील नगरपालिकांच्या प्रत्येकी एक अधिकारी-कर्मचार्‍यांना २0 ऑक्टोबरपासून ह्यव्हिडिओ कॉन्फरन्सिंगह्णद्वारे ऑनलाइन उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा स्तरावर घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींंकडून जिल्हय़ातील संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांना ऑनलाइन उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे; परंतु ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरणे व स्वीकारण्याच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याची बाब गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ह्यव्हिडिओ कॉन्फरन्सिंगह्णद्वारे अकोला, बुलडाणा व वाशिम येथील प्रशिक्षणादरम्यान आढळून आली. या सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणी शनिवारी दूर करण्यात येणार असल्याचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षण देणार्‍या संबंधित तज्ज्ञांकडून प्रशिक्षणार्थी अधिकारी-कर्मचार्‍यांना सांगण्यात आले. त्यानुषंगाने ऑनलाइन उमेदवारी स्वीकारण्याच्या 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे प्रशिक्षणासाठी शनिवारी सकाळी ११ वाजता जिल्हानिहाय संबंधित अधिकारी-कर्मचार्‍यांना बोलविण्यात आले आहे. नगरपालिका निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया २४ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे; मात्र ऑनलाइन उमेदवारी स्वीकारण्याच्या सॉफ्टवेअरमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी दूर न झाल्यास उमेदवार ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरणार कसे, याबाबत संभ्रम कायमच आहे.