अकोला, दि. २८- पातूर शहरात सिनेमागृहाच्या परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम व दोन मोबाइल जप्त करण्यात आले असून, दोघांवरही कारवाई करण्यात आली आहे.पातूर शहरातील एका सिनेमागृहाजवळ येथीलच रहिवासी मो. मुशरफ मो. उस्मान आणि गिर्हे हे जुगार अड्डय़ावर जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी सायंकाळी या ठिकाणी छापा टाकून मो. मुशरफ मो. उस्मान आणि गिर्हे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख ४ हजार ७४0 रुपये आणि दोन मोबाइल, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात रणजित ठाकूर, अवचार, अमित दुबे व संदीप काटकर यांनी केली.
पातूर येथील जुगार अड्डय़ावर छापा
By admin | Updated: January 29, 2017 02:16 IST