शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

देशी बीटी कापसाचे बियाणे तयार; येत्या हंगामात शेतकऱ्यांना देणार ५५ हजार पॅकेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 14:53 IST

अकोला : लोकप्रिय देशी कपाशी वाणात जनुकीय बदल करू न पीकव्ही-२ बीटी, बीजी-२ ही दोन देशी बीटी कपाशीचे वाण विकसित करण्यात महाराष्ट्र राज्य बियाणे (महाबीज) महामंडळाला यश आले.

- राजरत्न सिरसाटअकोला : लोकप्रिय देशी कपाशी वाणात जनुकीय बदल करू न पीकव्ही-२ बीटी, बीजी-२ ही दोन देशी बीटी कपाशीचे वाण विकसित करण्यात महाराष्ट्र राज्य बियाणे (महाबीज) महामंडळाला यश आले असून, पुढच्या वर्षी शेतकºयांना ५५ हजार पॅकेट उपलब्ध करू न देण्याचे उद्दिष्ट असल्याने यावर्षी देशातील विविध भागात या वाणांचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात आले.अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तत्कालीन मुख्य कापूस शास्त्रज्ञ डॉ. एम. ए. तय्यब यांनी १९८१ मध्ये विकसित केलेले पीकेव्ही ४६८ कपाशीचे तसेच परभणीच्या नांदेड-४४ (एनएच-४४) वाणात जनुकीय बदल करण्यात महाबीजला यश आले आहे. बोंडअळी व रसशोषण करणाºया किडींना प्रतिकारक्षम हे वाण असून, पुढच्या वर्षी शेतकºयांना पेरणीसाठी हे वाण उपलब्ध करू न देण्याचे उद्दिष्ट असल्याने राज्यातील अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख, परभणीचे स्व. वसंतराव नाईक तसेच राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांच्या प्रक्षेत्रासह गुजरातमध्ये यावर्षी या वाणाचे मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. पीकेव्ही ४६८ या संकरित कपाशी वाणांची दोन दशके प्रचंड मागणी होती. महाराष्टÑासह आंध्र प्रदेश, गुजरातमध्ये हे प्रचंड लोकप्रिय होते. तद्वतच नांदेड-४४ (एनएच-४४) हे संकरित कपाशीचे वाण मराठवाडा, खान्देशात प्रचंड लोकप्रिय होते. तब्बल दोन दशके अधिराज्य गाजविलेले दोन्ही वाण बीटीने प्रवेश केल्यानंतर मात्र मागे पडले. याच दोन्ही संकरित वाणांमध्ये जनुकीय (बीटी जीन) बदल करू न बीटी वाण विकसित करण्यात आले आहे. अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख, परभणीचे स्व. वसंतराव नाईक मराठवाडा व राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या समन्वयाने एका परदेशी कंपनीकडून बीटी जनुक तंत्रज्ञान मिळविण्यासाठी करार करण्यात आला. मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या संशोधनाला आता यश आले असून, मागच्या वर्षी चाचणी घेतल्यानंतर यावर्षी या दोन्ही वाणांचे बीजोत्पादन प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. पुढच्या वर्षीच्या खरीप हंगामात शेतकºयांना हे बियाणे उपलब्ध केले जाणार आहे.

- पीकेव्ही-४६८ व नांदेड-४४ या संकरित कापूस वाणात जनुकीय बदल करू न (बीटी जीन टाकून) बीटी-२, बीजी-२ कपाशीचे वाण विकसित करण्यात आले आहे. पुढच्या खरीप हंगामात शेतकºयांना ५५ हजार पॅकेट या बीटीचे उपलब्ध करू न देण्याचे उद्दिष्ट आहे.ओमप्रकाश देशमुख,व्यवस्थापकीय संचालक,महाबीज, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठagricultureशेती