शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

पीआरसीने दिले बाळापूर बीडीओ, ग्रामसेवकाच्या निलंबनाचे आदेश!

By admin | Updated: June 3, 2017 02:04 IST

बाळापूर: पंचायत राज समितीच्या पथकाने बाळापूर पंचायत समिती सभागृहात आल्यावर बराच वेळपर्यंत गटविकास अधिकारी वाय. डी. शिंदे हे आले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर: पंचायत राज समितीच्या पथकाने बाळापूर पंचायत समिती सभागृहात आल्यावर बराच वेळपर्यंत गटविकास अधिकारी वाय. डी. शिंदे हे आले नाही. त्यामुळे शिंदे यांना निलंबित करण्याचे आदेश समितीचे अध्यक्ष आ. प्रकाश भारसाकळे यांनी समिती सचिव विलास आठवले यांना दिल्याची चर्चा यावेळी होती. कान्हेरी गवळीचे ग्रामसेवक जी.के. धाडसे वेळेवर उपस्थित न राहिल्याने त्यांनाही निलबंनाचे आदेश दिल्याची माहिती आहे. पंचायत समितीत अधिकारी हजर नसल्याने समितीने सभागृहातून बहिर्गमन केले. त्यानंतर पथकाने कान्हेरी (गवळी) येथील सिमेंट रस्त्याची पाहणी केली. या सिमेंट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. त्यांना घरकुल देण्याची शिफारस समितीने केली व तेथील नागरिकांच्या घरात जाऊन कामाची व घरकुल शासकीय योजनेबाबत नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विहिरीचे देयक थकीत आहे. प्रत्येक ठिकाणी पैसे दिल्याशिवाय विहीर, घरकुलाचे देयक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मंजूर होत नसल्याचे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी पथकाला सांगितले. शेळद येथील भिकुंड नदीमधील कोल्हापुरी बंधारा २००६-०७ मध्ये मंजूर झाला आहे. त्यासाठी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. तो तक्रार नसतानाही बंद पडला. निकृष्ट दर्जाच्या या बंधाऱ्याबाबत समितीने नाराजी व्यक्त केली. याच बंधाऱ्याच्या दुरुस्ती बांधकामासाठी जि. प. ने ५८ लाख रुपये मंजू केले. एकूण ७८ लाख हे पाण्यात गेले असून, अल्पकाळातच हा बंधारा निकृष्ट दर्जाने नामशेष होईल. शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग करण्यात आला. याबाबत वरिष्ठ स्तरावरून निर्णय घेण्यात येईल, असे समितीने स्पष्ट केले. रिधोरा येथील ग्रामपंचायतीची उत्कृष्ट इमारत, वैद्यकीय उपकेंद्र व जि. प. शाळेबाबत समाधान व्यक्त केले.पथकामध्ये समिती अध्यक्ष आ. प्रकाश भारसाकळे, आ. अमित झनक, राहुलदादा मोटे, आ. बुंदेले, समिती सचिव विलास आठवले, गटविकास अधिकारी वाय. डी. श्ािंदे, जि. प. बांधकाम विभागाचे अभियंता वामनराव राठोड, विस्तार अधिकारी पी. व्ही. दुधे आदी जि. प. व पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्रा. पं. ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते. नगारिकांच्या आलेल्या तक्रारींना पाठपुरावा न करता आल्याने ग्रामविकास अधिकारी जी. के. धाडसे यांना सायंकाळपर्यंत निलंबित करण्याचे आदेश समितीने जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सुभाष पवार यांना दिले. दरम्यान या आदेशासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला.शाळेत आढळले मुदतबाह्य मिरची पावडर शाळेतील भोजनालयात मिरची पावडर मुदतबाह्य आढळून आल्याने समिती सदस्य आ. अमित झनक यांनी मिरची पावडरबाबत कारवाई करण्यासाठी जबाबदारी ठरविण्याचे आदेश दिले. तसेच तांदळाच्या प्रत्येक कट्ट्यात कमी तांदूळ आढळून आले. तांदूळ मोजण्यासाठी काट्याचा वापर नसल्याने समितीने नाराजी व्यक्त केली तर याच जि. प. शाळेला दुरुस्ती बांधकामासाठी ७ लाख जि. प. ला निधी देण्याचा आदेश समितीने जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सुभाष पवार यांना दिले.