शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रींटिंग प्रेस संचालकाचे बयाण नोंदविले!

By admin | Updated: January 5, 2016 01:59 IST

किडनी तस्करी प्रकरणामध्ये बनावट दस्तऐवज तयार करणार्‍या प्रींटिंग प्रेसच्या संचालकास खदान पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेऊन त्याचे बयाण नोंदविले.

अकोला - किडनी तस्करी प्रकरणामध्ये बनावट दस्तऐवज तयार करणार्‍या प्रींटिंग प्रेसच्या संचालकास खदान पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेऊन त्याचे बयाण नोंदविले. प्रमोद शेजव असे प्रींटिंग प्रेस संचालकाचे नाव असून, त्याने बनावट दस्तऐवज तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा संशय पोलिसांना आहे.किडनी तस्करी प्रकरणामधील पीडित अमर शिरसाट व किडनी खरेदी करणारा जुने शहरातील रहिवासी संतोष कोल्हटकर, संतोष गवळी व शांताबाई खरात यांची किडनी काढून त्यांना मोबदल्यात तुटपुंजी रक्कम देऊन फसवणूक करण्यात आली होती. या फसवणुकीची तक्रार तिघांनीही पोलीस ठाण्यात केल्यानंतर तसेच ह्यलोकमतह्णने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने किडनी तस्करांच्या मोठय़ा रॅकेटचा पर्दाफाश झाला. या प्रकरणाचा सूत्रधार शिवाजी कोळी, देवेंद्र शिरसाट, आनंद जाधव, विनोद पवार यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर किडनी तस्करी प्रकरणामध्ये प्रत्येक स्तरावर वापरण्यात आलेले दस्तऐवज हे बनावट असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यामधील काही बनावट दस्तऐवज हरिहरपेठेतील प्रमोद प्रींटिंग प्रेसमध्ये बनविण्यात आल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी या प्रकरणी महेंद्र तायडे याला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता सोमवारी प्रमोद शेजव याला ताब्यात घेऊन त्याचे बयाण नोंदविण्यात आले आहे. प्रमोद शेजव याच्या बयाणानंतर पोलीस सखोल तपास करून पुढील कारवाई करणार आहेत. किडनी तस्करीमध्ये ओळखपत्र बनावट तयार करणे, समितीचे दस्तऐवजही बनावट तयार क ेल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.