शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टकोविड रुग्णांनी काळजी घेण्याची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:19 IST

खासगी बसमध्ये नियमांचे पालन नाहीच अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासादरम्यान मास्कचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य करण्यात ...

खासगी बसमध्ये नियमांचे पालन नाहीच

अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासादरम्यान मास्कचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, शहरातून धावणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या बसेससोबतच खासगी प्रवाशी बसेसमध्ये या नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वेगाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जय हिंद चौकात वाहतुकीची कोंडी

अकोला : जयहिंद चौक हा जुना शहरातील प्रमुख रस्ता आहे. याच मार्गावर शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराचे मंदिर असून भाजी बाजारदेखील आहे. पार्किंगची योग्य जागा नसल्याने अनेकजण रस्त्यावरच वाहने पार्क करीत असल्याने नेहमीच वाहतुकीची कोंडी निर्माण होते. ऑटोचालकही रस्त्याच्या मध्येच वाहने उभी करीत असल्याने अनेकदा येथे किरकोळ वादही होतात.

नदीपात्रात अस्वच्छता

अकोला : शहरातील मुख्य नाले मार्णा नदीपात्रात सोडण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील बहुतांश घाण पाणी नदीपात्रात जमा होते. शिवाय, अनेक लोक नदीपात्रातच कचरा टाकत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे डासांचाही प्रादुर्भाव वाढला असून, नदीजवळील परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

गायगाव मार्गावर रस्त्यावर धूळ

अकोला : डाबकी रोडमार्गे गायगावकडे जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था झाली असून, या मार्गावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य झाले आहे. रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असल्याने या भागात धुळीचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाहनधारकांना या धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. हा त्रास पाहता सोमवारी (दि. २२) या मार्गावर पाणी टाकण्यात आले होते.

बसस्थानकावर फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

अकोला : एसटी महामंडळाच्या आगार क्रमांक एक आणि मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे; मात्र या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेकजण विनामास्क बसमध्ये बसल्याचे दिसून येतात. त्यामुळे कोरोनाच्या फैलावाची शक्यता नाकारता येत नाही.