शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील पोलिस चौकी सहा वर्षांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 18:12 IST

Police outpost on national highways have been closed for six years : मागील काही वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेली ही पोलीस चौकी सध्या शोभेची वस्तू बनली आहे.

मूर्तिजापूर : येथील राष्ट्रीय महामार्गावरील कारंजा टी पॉइंट वर असलेल्या वाहतूक नियंत्रण पोलीस चौकी मागील सहा वर्षांपासून बंद असल्याने व वाहतुकीवर नियंत्रण नसल्याने या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.           पोलीस प्रशासनाकडून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण राहवे म्हणून पोलिस चौकी निर्माण करण्यात आली आहे. काही वर्षे चालू असलेली ही पोलिस चौकी अचानक बंद करण्यात आली आहे. मागील काही वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेली ही पोलीस चौकी सध्या शोभेची वस्तू बनली आहे. याठिकाणी पोलिस प्रशासनाचे वतीने वाहतूक पोलिसांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. पण ही पोलिस चौकी मागील काही वर्षांपासून बंद असल्याने अपघाताचे घटनेत वाढ झाली आहे. याकडे जिल्हा पोलिस अधीक्षक अकोला यांनी लक्ष देवुन ही हायवे पोलिस चौकी सुरू करण्याची मागणी होत आहे. शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील कारंजा टी पॉइंट वर पोलीस प्रशासनाच्या वतीने नॅशनल हायवे पोलिस चौकी निर्माण केली होती. परंतु कलांतराने ही पोलीस चौकी काही वर्षांपासून बंद करण्यात आल्यामुळे या मार्गावर चालणाऱ्या वाहतूकीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने अपघाताचे संख्येत वाढ झाली आहे. कदाचित अपघात झाला तर तातडीची मदतही वेळेवर अपघातग्रस्तांना मिळत नाही. सदर चौकी चालू करण्यासाठी  पोलिस प्रशासन व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. जर ही पोलिस चौकी पुन्हा सुरू केल्यास  वाहतुकीवर नियंत्रण राहील व अपघाताचे प्रमाणही कमी होईल.  गत काही दिवसांपासून बोरगांव मंजु ते मूर्तिजापुर दरम्यान अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यात अनेक निष्पाप जीवाचे बळी गेले आहेत. अनेक जडवाहनधारक आपली वाहने सुसाट वेगाने चालवितात याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने अपघाताचे संख्येत वाढ झाली असून अनेक नागरिक या रस्त्यावर अपघाताचे बळी ठरले आहेत. अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाचे राष्ट्रीय महामार्गावरील पोलिस चौकी तात्काळ सुरू करावी अशी मागणी नागरीकांमधून होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर