शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकार्‍याची दारुविक्रेत्याने पकडली कॉलर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:05 IST

बाळापूर : नजीकच्या वाडेगाव पोलीस चौकीच्या सहायक पोलीस निरीक्षकास एका दारू विक्रेत्याने पोलीस चौकीत जाऊन कॉलर पकडून जीवे मारण्याची धमकी देत लोटपोट केल्याची खळबळजनक घटना २७ ऑगस्ट रोजी घडली. 

ठळक मुद्देवाडेगाव चौकीतील घटना आरोपीस अटक 

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : नजीकच्या वाडेगाव पोलीस चौकीच्या सहायक पोलीस निरीक्षकास एका दारू विक्रेत्याने पोलीस चौकीत जाऊन कॉलर पकडून जीवे मारण्याची धमकी देत लोटपोट केल्याची खळबळजनक घटना २७ ऑगस्ट रोजी घडली. तसेच त्यांच्या सहकार्‍यालासुद्धा जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून बाळापूर पोलिसांमार्फत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.वाडेगावातील पोलीस चौकीतील सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार खंडारे यांना रविवारी अवैध दारू विक्रेता श्रीकृष्ण रामकृष्ण  वानखडे याने  पोलीस  चौकीत जाऊन कॉलर पकडून जीवे मारण्याची धमकी देऊन लोटालोट केली. यावेळी त्यांचे सहकारी संजय वाघ यांनासुद्धा  मारण्याची  धमकी  दिली. या घटनेबाबत सहायक  पोलीस उपनिरीक्षक राजकुमार खंडारे यांच्या फिर्यादीवरून बाळापूर  पोलीस  स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध  भा.दं.वि.च्या ३५३ कलमानुसार  गुन्हा  दाखल करून आरोपीला अटक  केली. सदर आरोपी हा गायगाव ग्रामपंचायतचा माजी सरपंच आहे. त्याला १५ दिवसांपूर्वी पारस फाटा येथे चार चाकी गाडीतून दारू वाहतूक करताना पोलिसांनी पकडले होते. त्याचे चारचाकी वाहन अद्यापही पोलिसांच्या ताब्यात  आहे. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा  पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत. अलीकडे गुंड व अनेक दादांची पोलिसांवर हात टाकण्याची हिंमत वाढल्याचे या प्रकरणावरून अधोरेखित होत आहे.