शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खपाटे हत्याकांडातील दोघांना पोलीस कोठडी

By admin | Updated: July 4, 2017 02:42 IST

अकोला: विकास ऊर्फ विक्की खपाटे याची २६ जून रोजी दुपारी नितीन शाहू, करण शाहू, चेतन शाहू, राजेश कोटोले यांनी जुन्या वादातून आणि व्याजाच्या व्यवसायातून निर्घृण हत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: हरिहरपेठेतील गाडगे नगरात राहणारा विकास ऊर्फ विक्की खपाटे याची २६ जून रोजी दुपारी नितीन शाहू, करण शाहू, चेतन शाहू, राजेश कोटोले यांनी जुन्या वादातून आणि व्याजाच्या व्यवसायातून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी आरोपी नितीन प्रकाश शाहू (२६), करण अशोक शाहू (२५) यांना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. विक्की खपाटे याने व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय वाढविला होता. त्याने या व्यवसायात केलेली प्रगती पाहून, आरोपी नितीन शाहू, करण शाहू, चेतन शाहू, राजेश कोटोले यांनी त्याचा काटा काढण्याचे ठरविले. आरोपीसुद्धा व्याजाचा व्यवसाय करीत असल्याने, विक्की त्यांच्या व्यवसायात अडसर ठरत होता. तसेच विक्की खपाटे याच्यासोबत आरोपींचे जुने वाद होते. त्यामुळे आरोपींनी विक्कीवर लोखंडी पाइप व फरशी कुऱ्हाडीने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. जुने शहर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी नितीन शाहू, करण शाहू आणि राजेश काटोले यांना अटक केली होती. शाहू बंधूंना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यांच्या कोठडीची मुदत संपल्याने, पोलिसांनी त्यांना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर केले. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ जी.एल. इंगोले यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. याला आरोपीच्या विधिज्ञांनी विरोध केला. यासाठी हवी पोलीस कोठडीपोलिसांनी न्यायालयाकडे आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करायची आहे. फरार आरोपींची माहिती घ्यायची आहे. त्यांनी विक्की खपाटेची हत्या कोणत्या कारणासाठी केली, याची सखोल चौकशी करायची असल्याने, आरोपींना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर आपला निर्णय दिला.