शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार निवारणासाठी पोलिसांना आता ‘टाइम लिमिट’

By admin | Updated: June 21, 2016 23:44 IST

गृहविभागाचे आदेशाची प्रभावी अमंलबजावणी झाल्यास पोलीस प्रशासन लोकाभिमुख होणार!

नीलेश शहाकार/बुलडाणा पोलीस प्रशासनाला लोकाभिमुख करण्यासाठी पोलिसांत दाखल होणार्‍या प्रत्येक तक्रारीचे निराकरण करण्यासाठी पोलिसांना टाइम लिमिट ठरविण्याचे आदेश गृहविभागाने दिले आहेत.राज्य शासनाच्या गृहविभागाने १७ जून रोजी याबाबत आदेश पारित केला असून, सदर आदेश २0 जून रोजी राज्यातील पोलीस विभागाच्या प्रत्येक जिल्हा अधीक्षक कार्यालयात पोहोचला. पोलिसांकडे दररोज हजारो तक्रारी दाखल होत असतात. पोलिसांच्या कामाला गती देण्यासाठी या तक्रारींचे निराकरण करणे आवश्यक आहे तसेच तक्रारकर्त्यांचा सन्मान झाल्यास पोलिसांची विश्‍वासार्हता नक्कीच वाढते. यामुळे पोलीस प्रशासन आणखी लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे. नवीन आदेशानुसार, आता सामान्य नागरिक आपली तक्रार सरळ सहायक पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे करतील. तक्रारीचे निराकरण करण्यासाठी हे दोन्ही अधिकारी जबाबदार राहतील. तीन आठवड्यांपर्यंत याबाबत कारवाई न झाल्यास सदर प्रकरण पोलीस आयुक्त किंवा पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविण्यात येईल, शिवाय प्रकरणाची कार्यप्रगती प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला गृहविभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे सादर करावी लागणार आहे. त्यानुसार गंभीर प्रकरणांचा तत्काळ निपटारा करण्याचे आदेश दिले जातील.कोणत्याही तक्रारीवर प्रथम समुपदेशन केले जाईल. तरीही तक्रारी दाखल झाली, तर याची प्राथमिक तपासणी करण्याचे लेखी आदेश सहायक पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपअधीक्षक संबधित पोलीस ठाण्याला देतील. तक्रारीत सत्यता आढळून आल्यानंतर कारवाईचे लेखी आदेश पोलीस ठाण्याला देण्यात येईल तसेच तक्रारीवर होणार्‍या प्रत्येक कारवाईचा रिपोर्ट तक्रारकर्त्यांना उपलब्ध करून देण्याची जवाबदारी सहायक पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपअधीक्षक यांनी राहणार आहे. ही सर्व कार्यवाही तक्रार प्राप्त झाल्यानंतर तीन आठवड्यांच्या आत करायची आहे. -तक्रारकर्त्याचा गृहविभागाशी थेट संपर्कएखाद्या तक्रारीवर तीन महिन्यापर्यत कार्यवाही झाली नाही, प्रकरण प्रलंबित राहिले, तर तक्रारकर्ता थेट मंत्रालयातील गृहविभागाशी संपर्क साधून तक्रारीचा पाठपुरावा करून कारवाईची मागणी करू शकणार आहे.