शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

लढतींचे चित्र स्पष्ट!

By admin | Updated: October 2, 2014 02:01 IST

अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघात पंचरंगी लढत.

अकोला: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले असून, आता जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात पंचरंगी लढतीची धुमशान सुरू झाली आहे. जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात एकूण ९३ उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर, जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्‍चिम, आकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या पाचही मतदारसंघात एकूण ९३ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम असल्याचे चित्र स्पष्ट झाले. निवडणूक रिंगणातील या उमेदवारांमध्ये विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी दुभंगल्याच्या स्थितीत होत असलेल्या या विधानसभा निवडणुकीत यावेळी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात प्रामुख्याने पंचरंगी लढत रंगणार आहे. त्यानुषंगाने निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व भारिप- बहुजन महासंघाच्या उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे.** ६६ उमेदवारांची माघारविधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, बुधवारी जिल्ह्यातील पाच मतदारसंघात एकूण ६६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून, पाच मतदारसंघात ९३ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार, १ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. त्यामध्ये जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील ६६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या काही दिग्गज उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. एकूण १५९ उमेदवारांपैकी ६६ उमेदवारांनी माघार घेतल्याने पाच मतदारसंघात ९३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक आहेत.