लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू: मुंबई-नागपूर राष्टÑीय महामार्गावर पातूर फाट्यावर पेट्रोल-डिझेलचा टँकर उलटल्याची घटना ६ आॅगस्टच्या सकाळी १० वाजताच्या दरम्यान घडली.अकोल्याहून अमरावतीकडे जाणारा एमएच-३० एल १२७१ क्रमांकाचा टँकर चालकाने नियंत्रण सुटल्यामुळे टँकर रस्त्याच्या बाजूला खाली जाऊन उलटला; परंतु सुदैवाने कसलीहीजीवितहानी झाली नाही. या टँकरमध्ये डिझेल व पेट्रोल होते. त्याला अपघात झाला.मात्र, सुदैवाने काही अनर्थ घडला नाही. हे वृत्त लिहीपर्यंत सदर टँकरमधून डिझेल व पेट्रोलची गळती सुरूच होती. मूर्तिजापूर व बोरगाव मंजू येथील पोलीस घटनास्थळी दाखलझाले. तसेच अकोला येथील अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर सदर टँकरला वर काढण्यासाठी जेसीबी मशीनदेखील पोहोचली होती.
पेट्रोलचा टँकर उलटला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 02:19 IST
लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू: मुंबई-नागपूर राष्टÑीय महामार्गावर पातूर फाट्यावर पेट्रोल-डिझेलचा टँकर उलटल्याची घटना ६ आॅगस्टच्या सकाळी १० वाजताच्या दरम्यान घडली.अकोल्याहून अमरावतीकडे जाणारा एमएच-३० एल १२७१ क्रमांकाचा टँकर चालकाने नियंत्रण सुटल्यामुळे टँकर रस्त्याच्या बाजूला खाली जाऊन उलटला; परंतु सुदैवाने कसलीहीजीवितहानी झाली नाही. या टँकरमध्ये डिझेल व पेट्रोल होते. त्याला अपघात झाला.मात्र, ...
पेट्रोलचा टँकर उलटला!
ठळक मुद्दे अनर्थ टळला!