शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशक परवान्यांचे नूतनीकरण सुरूच!

By admin | Updated: May 23, 2017 01:25 IST

बंदीचा निर्णय धाब्यावर : कृषी आयुक्तांनी दिले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कृषी साहित्य विक्री करणाऱ्या परवानाधारकांपैकी कीटकनाशकाची विक्री करणारांच्या परवान्याचे नूतनीकरणाची बाब वगळण्यात आल्यानंतरही राज्यात अनेक ठिकाणी हा प्रकार सुरू आहे, तो तातडीने बंद करावा, असा आदेश कृषी आयुक्तांनी दिला आहे. त्याचवेळी बियाणे आणि रासायनिक खत विक्रेत्यांना परवाने नूतनीकरणाचे भूत कायम असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. कीटकनाशक विक्री करणाऱ्या परवानाधारकांची सोय शासनाने केली. त्यातून राज्यभरात शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या शुल्क वसुलीवर पाणी सोडण्यात आले आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना सातत्याने होणाऱ्या नूतनीकरणाच्या प्रक्रिया शुल्कातून सूट देण्यात आली. त्यासाठी केंद्र शासनाच्या कीटकनाशक नियम १९७२ मधील तरतूद वगळण्यात आली. ५ नोव्हेंबर २०१५ रोजी केंद्र शासनाने त्यासाठी अधिसूचना काढली. त्यामध्ये कीटकनाशक परवान्यांचे नूतनीकरण करणे, हे नियमातूनच वगळण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्या दिवसापासूनच कीटकनाशक परवान्याचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया परवाना अधिकारी म्हणून जिल्हा परिषदांच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी थांबवणे आवश्यक होते. मात्र, तरीही परवाने नूतनीकरणाची प्रक्रिया राज्यभरात सुरूच असल्याची प्रकरणे आयुक्तालयांपर्यंत पोहोचली. त्यावर सर्वच कृषी विकास अधिकारी परवाने नूतनीकरणाची प्रक्रिया राबवत असल्याचे आयुक्त कार्यालयाने निदर्शनास आणून देत, यापुढे कायद्यानुसार परवाने देण्याची कार्यवाही सुरू ठेवावी, असा आदेशच कृषी आयुक्तांनी २० मे २०१७ रोजी दिला. त्यानुसार आता परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया थांबणार आहे. शासनाच्या कोट्यवधींच्या महसुलावर पाणी!कृषी विभागाकडून बियाणे, खते, कीटकनाशके परवाने दिले जातात. त्या परवान्यांचे विहित मुदतीनंतर नूतनीकरण केले जाते. बियाणे आणि खत विक्रेत्यांनाच परवाना नूतनीकरण करणे आणि शासनाला शुल्क भरावे लागणार आहेत. त्यातून कीटकनाशक विक्रेत्यांना सूट देण्यात आली आहे. राज्यभरातील कीटकनाशक विक्रेत्यांची संख्या आणि त्यांच्याकडून ग्रामीणसाठी १५००, शहरी भागासाठी ७५०० रुपये प्रमाणे वसूल होणारी शुल्काची रक्कम पाहता शासनाला दरवर्षी १० ते १३ कोटी रुपये महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.