अकोला : आजची स्त्री स्वत:चे गृहिणीपद सांभाळून अनेक क्षेत्रात कार्यरत असताना आपले कौशल्य, जबाबदार्या, समयसूचकता अनुभव याची जाणीव ठेवून अनेक कलागुण अंगी जोपासते. त्यांच्या सर्वांंगीण विकासाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होण्याच्या दृष्टीने लोकमत सखी मंच व ह्यअस्पायरह्ण घेऊन येत आहे, ह्यमीट यूअर सेल्फ ह्ण एक व्यक्तिमत्त्व विकास सेमिनार. हा सेमिनार शनिवार, २६ जुलै रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत प्रमिलाताई ओक हॉल येथे घेण्यात येणार आहे. ज्यात अस्पायरचे संचालक सचिन बुरघाटे महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. बदलत्या काळानुसार गरज ओळखून स्वत:मध्ये कसे व काय बदल करावे, आर्थिक सक्षमतेसोबत मानसिक सक्षमता निर्माण कशी करावी, वेळेचे योग्य नियोजन आणि मूल्यमापन कसे करावे, विपरीत परिस्थितीत घ्यायची निर्णय क्षमता आणि कार्यपद्धतीचा विचार, कुटुंब आणि समाज यातील समन्वय साधण्याची कला, सुसंवादाने सहज सुटणार्या अनेक समस्यांचे मार्गदर्शन, आदी विषयांवरती सचिन बुरघाटे विस्तृत मार्गदर्शन करणार आहेत. हा सेमिनार केवळ महिलांकरिता खुला असून नि:शुल्क आहे. सेमिनारमध्ये सहभाग घेण्याकरिता पास घेणे आवश्यक आहे. पासेस ह्यलोकमतह्ण शहर कार्यालय, सेठी हाईट्स येथे व अस्पायर, सहकारनगर, गोरक्षण रोड येथे उपलब्ध आहे. सकाळी १0 ते ६ या वेळेत महिला पासेस घेऊ शकतात व आपली जागा निश्चित करू शकतात. तरी जस्तीत जास्त महिलांनी या अभूतपूर्व संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सखी मंचतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीकरिता सखी मंच संयोजिक मीनाक्षी फिरके यांच्याशी 9850382140 या क्रमांकावर संपर्क साधावा.
व्यक्तिमत्त्व विकास सेमिनार ‘मीट युवर सेल्फ’ २६ ला
By admin | Updated: July 23, 2014 01:01 IST