शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात वाढली लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची टक्केवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 11:14 IST

Corona Vaccine : लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत सुमारे ११.३१ टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

- प्रवीण खेते

अकाेला: जिल्ह्यातील कोविडची स्थिती नियंत्रणात येत असून लसीकरणाची टक्केवारी वाढत आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत सुमारे ११.३१ टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. महिनाभरापूर्वी हा आकडा केवळ पाच टक्क्यांवर होता. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १४ लाख ८१ हजार ६९५ लोकांना कोविडची लस देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत २७.४७ टक्के म्हणजेच ४ लाख ६ हजार ९८९ लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यापैकी सुमारे १ लाख ६७ हजार ५९३ लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. म्हणजेच आतापर्यंत सुमारे ११. ३१ टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. गत महिनाभरात लसीकरणाला वेग आला असून दुसऱ्या डोससाठी विशेष सत्र राबविण्यात आले आहे. त्यामुळे पहिला डोस घेणाऱ्यांच्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त झाल्याचे दिसून आले. महिनाभरातच लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ५ टक्क्यांवरून ११.३१ टक्क्यांवर आले आहे.

 

वर्गवारीनुसार लसीकरण

घटक             - पहिला डोस - दुसरा डोस (संख्या टक्केवारीमध्ये)

हेल्थ केअर वर्कर्स - ९२.८५ - ६६.७७

फ्रंटलाईन वर्कर्स - ९९.६६ - ७३.३१

१८ ते ४४ वयोगट - १६.९१ - ३.२१

४५ ते ५९ वयोगट - ३३.१८ - १७.४५

६० वर्षांवरील - ५०.९६ - २४.८७

 

हेल्थ केअर वर्कर्समध्ये उदासीनता

जिल्ह्यात लसीकरणाला वेग आला आहे, मात्र अद्यापही अनेक हेल्थ केअर वर्कर्सने लसीचा पहिला डोसही घेतला नसल्याचे दिसून येते. तसेच केवळ ६६.७७ टक्के लोकांनीच लसीचा दुसरा डोस घेतला आहे. ही बाब लक्षात घेता लसीकरणाविषयी आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येच जनजागृतीची गरज आहे.

 

जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढत आहे. पहिल्या डोससोबतच दुसऱ्या डोससाठीही प्राधान्य दिले जात असून, त्यानुसार नियोजन केले जात आहे. त्यामुळेच दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या वाढताना दिसून येत आहे.

- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाCorona vaccineकोरोनाची लस