शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात जनतेनेच नाकारला ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 17:36 IST

जनता कर्फ्यूला जनतेनेच ठेंगा दाखवित लोकप्रतिनिधींना तोंडघशी पाडले आहे.

ठळक मुद्देअनेक परिसरात इतर दुकानेही उघडल्या गेली होती.जनतेने कुठलाही प्रतिसाद दिल्याचे जाणवले नाही.

अकोला : अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी १ ते ६ जून या सहा दिवसांच्या कालावधीत शहरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केले होते; मात्र या आवाहनाला न जुमानता जनताच रत्यावर उतरलेली दिसली. तब्बल ७२ दिवसानंतर अकोल्यात जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानांसोबतच अनेक परिसरात इतर दुकानेही उघडल्या गेली होती. त्यामुळे जनता कर्फ्यूला जनतेनेच ठेंगा दाखवित लोकप्रतिनिधींना तोंडघशी पाडले आहे.अकोला महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पावसाळाही तोंडावर आला आहे अशा स्थितीत कोरोनाची साखळी तुटली नाही तर पावसाळ्यात साथीचे आजारदेखील उद्भवण्याची शक्यता असते. त्यानुषंगाने २८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत १ ते ६ जून या सहा दिवसांच्या कालावधीत शहरात ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यावर एकमत झाले होते. या ‘जनता कर्फ्यू’ला राज्याच्या मुख्य सचिवांनी मान्यता न दिल्याने अखेर रविवारी रात्री जनता कर्फ्यूला ‘स्वयंस्फूर्त’ करण्याचे आवाहन करण्यात आले होते; मात्र त्याला जनतेने कुठलाही प्रतिसाद दिल्याचे जाणवले नाही. 

टॅग्स :AkolaअकोलाBacchu Kaduबच्चू कडू