शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विशेष कार्यकारी अधिकार्‍यांच्या नियुक्त्या प्रलंबित

By admin | Updated: July 7, 2014 18:22 IST

६१८ कार्यकर्त्यांच्या नावाचा प्रस्ताव शासनाकडे

अकोला : जिल्ह्यात विशेष कार्यकारी अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यासाठी ६१८ कार्यकर्त्यांंच्या नावांचा प्रस्ताव गेल्या चार महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाच्या सामान्य प्रशासन खात्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळाली नसल्याने, जिल्ह्यातील विशेष कार्यकारी अधिकार्‍यांच्या शासन दरबारी प्रलंबित आहेत.जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात विद्यार्थी आणि नागरिकांना महत्त्वाच्या कामांसाठी लागणार्‍या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती साक्षांकित करणे तसेच ओळखपत्र देण्याचे काम विशेष कार्यकारी अधिकार्‍यांमार्फत केले जाते. अकोला जिल्ह्यात सध्या ३७७ विशेष कार्यकारी अधिकारी कार्यरत असून, २ हजार १६८ विशेष कार्यकारी अधिकार्‍यांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर विशेष कार्यकारी अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यासाठी जिल्ह्यातील आमदार आणि विविध राजकीय पक्षांमार्फत प्राप्त झालेल्या नावांच्या याद्यांनुसार, जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केलेल्या शिफारशीनुसार १ हजार ६0 व्यक्तींच्या नावांची यादी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे चारित्र्य पडताळणीसाठी पाठविण्यात आली होती. चारित्र्य पडताळणीत पात्र ठरलेल्या ६१८ व्यक्तींच्या नावांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेमार्फत गेल्या चार महिन्यांपूर्वी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन खात्याकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला. या प्रस्तावात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांंचा समावेश आहे. चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्यापही शासनाकडून प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्याने, जिल्ह्यातील विशेष कार्यकारी अधिकार्‍यांच्या नियुक्त्या शासन दरबारी प्रलंबित असल्याची स्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विशेष कार्यकारी अधिकार्‍यांच्या नियुक्तीसाठी शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या यादीला केव्हा मान्यता मिळते, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.