शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

लाखो रूपयांची देयके धनादेशाविना अदा

By admin | Updated: September 13, 2014 23:34 IST

वाशिम जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश.

वाशिम : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची लाखो रुपयाची देयके धनादेशाव्दारे न देता रोख अदा केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असुन एक लाखाच्यावर देयके काढणार्‍या जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे सक्त निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. सनदी लेखापाल यांच्या लेखापरिक्षण अहवालात गैर प्रकारावर आक्षेप घेण्यात आला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यापूर्वीच बैठक घेऊन संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या व तसे लेखी आदेशही दिले होते. दोन दिवसापूर्वी याविषयी सर्व गटविकास अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. मात्र ही बाब गांभीर्याने न घेतल्यामुळे सीईओ जयवंशी यांनी तातडीची बौठक बोलावुन सर्व बीडिओंना चांगलेच धारेवर धरले. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाचे एक लाखावर परस्पर देयके काढणार्‍यांमध्ये वाशिम तालुक्यातील उकळीपेन, रिसोड तालुक्यातील कुर्‍हा, मंगरुळपीर तालुक्यातील हिरंगी, गोगरी, सिंगडोह, आमगव्हाण, माळशेलु, दाभडी आणि खडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.** कामे पूर्ण केल्याशिवाय नविन कामांना मंजुरात नाहीशासन निर्णयाचे उल्लंघण करुन ५ किंवा त्यापेक्षा जास्त कामे अपूर्ण राहिलेल्या ग्रामपंचायतीमध्ये नवीन कामांना प्रशासकीय मंजुरी देऊ नये आणि अपुर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करावी अशा सुचनाही सीईओ जयवंशी यांनी यावेळी दिल्या.** एनबीएच्या कामात विलंब नको निर्मल भारत अभियान अंतर्गत शौचालय बांधकाम व अनुदान वाटपाच्या कामांमध्ये कमालीची शिथिलता आली असुन या कामाना प्राधान्य देण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या. याकामात विलंब न लावता दर महिन्यात जिल्ह्यात चार हजार शौचालय बांधकाम व प्रोत्साहन अनुदान वाटप करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.