शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष, जातीचे ‘कार्ड’ बाद!

By admin | Updated: January 2, 2016 08:36 IST

विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात मतांच्या ध्रुवीकरणात सेनेची मुसंडी.

संतोष येलकर/अकोला: विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या तुलनेत शिवसेना -भाजप युतीच्या मतदारांचे संख्याबळ कमी असूनही, निवडणूक निकालात सेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांनी मुसंडी मारली. त्यामुळे या निवडणुकीत मतांच्या ध्रुवीकरणात पक्ष आणि जातीचे ह्यकार्डह्ण बाद ठरले.विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात तीनही जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती, महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतीचे नगरसेवक मिळून एकूण ७९१ मतदार आहेत. त्यामध्ये काँग्रेस २५३, राष्ट्रवादी काँग्रेस १२४, शिवसेना १0२, भाजपा १0३, भारिप-बहुजन महासंघ ७९ आणि अपक्ष व स्थानिक आघाडीच्या १३0 मतदारांचा समावेश आहे. मतदारसंघात काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या मतदारांचे संख्याबळ सर्वाधिक ३७७ असून, त्या तुलनेत शिवसेना-भाजप युतीच्या मतदारांचे संख्याबळ २0५ इतके आहे. आघाडीच्या तुलनेत मतदारांचे संख्याबळ कमी असूनही, शिवसेना-भाजप युतीचे आ. बाजोरिया यांनी ५१३ मते मिळवित विजयाची ह्यहॅट्ट्रिकह्ण केली. तर मतदारसंघात सर्वाधिक मतदारांची संख्या असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र सपकाळ यांना केवळ २३९ मते मिळाल्याने, त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. सेनेच्या बाजोरिया व राष्ट्रवादी काँग्रेसचे सपकाळ यांना मिळालेली मते लक्षात घेता, या निवडणुकीत पक्ष आणि जातीचे ह्यकार्डह्ण वापरून मते मिळविण्याची राजकीय मोर्चेबांधणी निष्प्रभ ठरली. तसेच शिवसेना -भाजप युतीसह विविध राजकीय पक्षांच्या मतदारांची साथ मिळाल्याने, मतांच्या ध्रुवीकरणात सेनेने मुसंडी मारल्याचे चित्र बुधवारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालात स्पष्ट झाले.'मराठा कार्ड'चा बोलबाला विरला हवेत!विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारादरम्यान, ह्यमराठा कार्डह्ण चा बोलबाला होता. या निवडणुकीत ह्यमराठा कार्डह्ण चालणार असून, त्याचा लाभ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला होणार असल्याची चर्चा रंगत होती. प्रत्यक्षात निवडणूक निकालात शिवसेनेचे आ. बाजोरिया यांनी २७४ मतांची आघाडी घेऊन, विजय मिळविल्याने, निवडणुकीतील 'मराठा कार्ड'चा बोलबाला हवेतच विरल्याचे चित्र स्पष्ट झाले.