शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

रेल्वे स्टेशन परिसरातील ‘पार्किंग’ व्यवस्था सुरळीत करा!

By admin | Updated: April 9, 2017 01:28 IST

गोपीकिशन बाजोरिया यांचे रेल्वे प्रशासन, वाहतूक शाखेला निर्देश.

अकोला : प्रवासी आणि वाहनधारकांना त्रास होणार नाही, यासाठी अकोला रेल्वे स्टेशन परिसरातील "पार्किंग" व्यवस्था तातडीने सुरळीत करण्याचे निर्देश आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी शनिवारी सायंकाळी रेल्वे प्रशासनासह पोलीस व वाहतूक शाखेला दिले.रेल्वे स्टेशन परिसरातील पार्किंगबाबत अडचणींसंदर्भात आ. बाजोरिया यांनी पार्किंग व्यवस्थेची पाहणी करून रेल्वे प्रशासन, पोलीस विभाग, शहर वाहतूक शाखा आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांसोबत चर्चा केली. त्यामध्ये प्रामुख्याने रेल्वे स्टेशनवर नातेवाइकांना घेण्यासाठी व सोडण्यासाठी येणार्‍या वाहनधारकांना प्रवेशद्वारावरच वाहन पार्किंंगमध्ये लावण्याची सक्ती केली जाते. चारचाकी वाहनांना रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश व बाहेर जाण्यासाठी नसलेली व्यवस्था, व्हीआयपी वाहनांसह दुचाकी-तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी वेगवेगळी नसलेली व्यवस्था आणि पार्किंगच्या परिसरात लावण्यात आलेली फलके इत्यादी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत रेल्वे स्टेशन परिसरात नातेवाइकांना सोडण्यासाठी व घेण्यासाठी येणार्‍या वाहनधारकांना प्रवेशद्वारावरच अडवून वाहन पार्किंंगमध्ये लावण्याची सक्ती करण्यात येऊ नये, चारचाकी वाहनांसाठी प्रवेश आणि बाहेर जाण्याची व्यवस्था करण्यात यावी, तसेच व्हीआयपी वाहनांसह तीनचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी वेगवेगळी पार्किंंगची व्यवस्था करून रेल्वे स्टेशन परिसरातील पार्किंंगची व्यवस्था सुस्थितीत करण्याचे निर्देश आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी दिले. यावेळी अकोला रेल्वेस्थानक अतिरिक्त प्रबंधक पी.एस.भट्ट, रेल्वे विभागाचे अकोला सेक्शन वरिष्ठ अभियता अरविंद रायबोले, रामदासपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावकार, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोटभरे, रेल्वे सुरक्षा दलाचे (जीआरपी) पोलीस उपनिरीक्षक आर.एन. यादव, आशू शर्मा, गणेश जकाते, रेल्वे वाणिज्य निरीक्षक मोहम्मद यामीन अन्सारी, नगरसेवक साजीदखान पठाण, गजानन चव्हाण उपस्थित होते.