शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पार्सल विभागाला विश्रामगृहातील सांडपाण्याचा अभिषेक!

By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST

मध्यवर्ती बसस्थानकावरील प्रकार; अधिका-यांचे दुर्लक्ष.

अकोला: मध्यवर्ती बसस्थानकाच्या निकासी प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पार्सल विभागाला वरती असलेल्या विश्रामगृहातील सांडपाण्याचा अभिषेक होत असल्याने पार्सल विभागातील कर्मचार्‍यांना तथा या ठिकाणी येणार्‍या ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. बसस्थानकावरील स्वच्छता आणि सुव्यवस्थेकडे अधिकारी वर्ग सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. मध्यवर्ती बसस्थानकावरील पार्सल विभाग गेल्या अनेक दिवसांपासून अस्वच्छतेच्या गर्तेत अडकला आहे. पार्सल विभागाच्या वरच्या भागातच लांब पल्ल्याच्या गाड्यांवर चालक-वाहक म्हणून ड्यूटी करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी विश्रामगृह आहे. या विश्रामगृहात आणि आजूबाजूला प्रचंड घाणीचे साम्राज्य असून, विश्रामगृहातील स्वच्छतागृहांचीदेखील दैनावस्था झाली आहे. स्वच्छतागृह आणि शौचालयातील घाण व सांडपाणी वाहून नेणार्‍या पाइपलाइन जागोजागी फुटलेल्या आहेत. या पाइपलाइन पार्सल विभागाच्या मुख्य प्रवेशद्वारालगत असल्याने त्यातून वाहणार्‍या सांडपाण्याचा ओघळ थेट प्रवेशद्वाराजवळ वाहतो. कंत्राटी तत्त्वावर पार्सल विभाग चालविणार्‍या अधिकार्‍यांनी या ठिकाणी दोन पाळय़ांमध्ये कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे. २४ तास सुरू राहणार्‍या या विभागात बाहेरगावाहून येणार्‍या आणि पाठविल्या जाणार्‍या पार्सलची आवक- जावक सुरू असते. त्यामुळे दिवसभर नागरिकांचीदेखील वर्दळ असते. सांडपाण्यामुळे पार्सल खराब होऊ नये म्हणून बहुतांशप्रसंगी बाहेरच्या भागातच पार्सली ठेवाव्या लागतात. या स्थितीमुळे पार्सल गहाळ होण्याच्या अनेक घटना या ठिकाणी घडल्या आहेत. स्वच्छता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पार्सल विभागातील कर्मचार्‍यांनी आगारप्रमुखांकडे तथा विभाग नियंत्रकांकडे वारंवार विनवण्या केल्या. मात्र, कुठल्याच ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याची माहिती येथील कर्मचार्‍यांनी ह्यलोकमतह्णला दिली. मध्यवर्ती बसस्थानकाच्या स्वच्छतेचे कंत्राट दिले असले तरी, कंत्राटदार ती कामे चोखरीत्या करतो की नाही, याचा साधा मागमूस घेणे तर दूर, रापमचे अधिकारी या भागात फिरकतदेखील नसल्याची खंत कर्मचार्‍यांनी व्यक्त केली. रापमच्या अधिकार्‍यांना स्वच्छता अभियानाचा विसर पडला असल्याचे स्पष्ट होत आहे.