शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१२ वीच्या उत्तरपत्रिकेचे पार्सल बेवारस आढळले

By admin | Updated: March 11, 2015 01:38 IST

बुलडाणा जिल्ह्यातील घटना, पार्सल डाक विभागाच्या ताब्यात

बुलडाणा : मोताळा तालुक्यातील वाघजाळ फाट्याजवळ १२ वीच्या उत्तरपत्रिकेचे पार्सल १0 मार्च रोजी बेवारस अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली. काही युवकांनी बुलडाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये हे पार्सल जमा केल्यानंतर डाक विभागाने ते ताब्यात घेतले. १0 व १२ वीच्या परिक्षा सर्वत्र सुरू असतानाच, मोताळा तालुक्यातील वाघजाळ फाट्याजवळ मलकापूर येथील संतोष रमेश पानसरे व विजय प्रल्हाद डोळसे यांना उत्तरपत्रिकेचे सीलबंद पार्सल आढळले. या पार्सलवर प्रेषक म्हणून अमरावती, परिक्षा मंडळ, अमरावती लिहिलेले असून प्रति म्हणून मनुबाई गुजराथी ज्युनिअर कॉलेज, अमरावती असे लिहिले आहे. या पार्सलची एक बाजू थोडी फाटली असून, त्यात १२ वीच्या उत्तरपत्रिका असल्याचे दिसून आले. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता या युवकांनी बुलडाणा पोलिस स्टेशनमध्ये पार्सल जमा केले. हे पार्सल डाक विभागाने संध्याकाळी ताब्यात घेतले. उत्तरपत्रिकेच्या पार्सलची एसटीतून वाहतूक सुरू असताना, वाघजाळ फाट्याजवळ ते पडल्याची चर्चा आहे. उत्तरपत्रिकेची वाहतूक करताना शिक्षण विभाग योग्य ती काळजी घेत नसून, यानिमित्ताने शिक्षण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.