शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

पंचायत समिती कार्यालयात चोरी!

By admin | Updated: March 20, 2017 02:37 IST

बाळापूर येथील घटना; १ लाख २0 हजार रुपये किमतीच्या विविध वस्तू लंपास.

बाळापूर, दि. १९- बाळापूर पंचायत समिती अंतर्गत विविध योजनांच्या लाभार्थींना वितरित करण्यासाठी उपलब्ध झालेल्या १ लाख २0 हजार रुपये किमतीच्या विविध वस्तू गोदाम व योग्य सुरक्षेअभावी चोरीस गेल्याची घटना १७ मार्चपूर्वी घडली. याबाबत बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार नोंदवूनही अद्यापपर्यंत कसलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.बाळापूर पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या विविध योजनांच्या लाभाथर्र्ींंची निवड झाल्यावर त्या लाभाथर्र्ींना विविध वस्तू अथवा साहित्याचे वाटप करण्यात येते. सदर वस्तू वा साहित्य ठेवण्यासाठी पंचायत समितीकडे गोदामाची व्यवस्था नाही. त्यामुळे सदर सर्व साहित्य सर्व कार्यालयातील बंद असलेल्या खोल्यात, माहिती केंद्रात ठेवले जाते. लाभार्थी आल्यास त्या साहित्याची पोच घेऊन साहित्य दिले जाते. समाजकल्याण विभागाचे १0 विद्युत पंप, १२ सोलर दिवे, असे १ लाख २0 हजार रुपयांचे साहित्य १७ मार्चपूर्वी कधीतरी कार्यालयावरील टिन तोडून चोरून नेल्याची बाब १७ मार्च रोजी कृषी विभागाच्या कर्मचार्‍याच्या लक्षात आली. त्यादिवशी लाभार्थींंना साहित्याचे वितरण करताना साहित्य चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यानंतर गट विकास अधिकारी वाय.डी. शिंदे यांनी बाळापूर पोलीस स्टेशनला लेखी फिर्याद दिली. अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही. लाभाथर्र्ींंना वाटप करण्याचे साहित्य ठेवण्यासाठी गोदाम नाही. तसेच पंचायत समितीमधील कार्यालयात रात्रीची सुरक्षा व्यवस्था नाही. पुरातत्त्व विभागाच्या ताब्यातील किल्ला परिसरात तालुका स्तरावरील सर्व प्रशासकीय कार्यालये आहेत. प्रशासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांची निवासस्थाने व कोषागार कार्यालय आहे. परंतु तेथे कुठलाही अधिकारी व कर्मचारी राहत नाही. तसेच कार्यालयाच्या सुरक्षेसाठी रात्रीचे पहारेकरी नसल्याने कार्यालयीन साहित्य चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. तरीही कुठलीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही. लाभवस्तू चोरीस गेल्यामुळे आता संबंधित लाभार्थींना त्या लाभ वस्तूंपासून वंचित राहावे लागणार आहे.