शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सावरगाव येथे आठवडाभरापासून व्हायरल फिव्हरची साथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:23 IST

सावरगाव येथे आरोग्य उपकेंद्र असून, त्या ठिकाणी आजारी रुग्णांवर थातुरमातूर उपचार केला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे रुग्ण ...

सावरगाव येथे आरोग्य उपकेंद्र असून, त्या ठिकाणी आजारी रुग्णांवर थातुरमातूर उपचार केला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे रुग्ण खासगी डॉक्टरकडे धाव घेत असून रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गेल्या आठवडाभरापासून सावरगाव येथे तापाची साथ सुरू आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एका घरात चार-चार सदस्य आजारी पडले आहेत. सर्दी, ताप, खोकला आदींचा त्रास असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. संबंधित आरोग्य विभागाने वेळीच दखल न घेतल्यास व्हायरल फिव्हरची साथ मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये लहान मुले, वृद्ध, तरुणांचा समावेश आहे.

घरोघरी जाऊन सर्व्हे करण्याची गरज

गावातील आरोग्य विभागाच्या उपकेंद्रात रुग्ण उपचारासाठी जातात; परंतु त्या ठिकाणी रुग्णांना दोन ते तीन गोळ्या देऊन परत पाठविले जाते. त्यामुळे तापाचे रुग्ण कमी होण्यापेक्षा वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. संबंधित आरोग्य विभागाच्या वरिष्ठांनी दखल घेऊन गावात घरोघरी जाऊन सर्व्हे करून आजारी असलेल्या रुग्णांवर उपचार करण्याची गरज आहे.

औषधींचा तुटवडा; रुग्ण त्रस्त

सावरगाव येथे आरोग्य उपकेंद्रामध्ये अनेक औषधींचा तुटवडा असल्यामुळे रुग्ण खासगी डॉक्टरकडे धाव घेत आहेत. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गावात आजारी रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाला असतानाही याकडे संबंधित आरोग्य विभागाचा कानाडोळा होत असल्याचा आरोप रुग्णांकडून होत आहे.

आरोग्य उपकेंद्रामध्ये अनेक औषधींचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांवर ठोस उपचार होत नसल्याने रुग्णांना खासगी डॉक्टरकडे धाव घ्यावी लागत आहे. संबंधितांनी वेळीच दखल घेऊन आजारी असलेल्या रुग्णांवर उपचार करावा, अन्यथा व्हायरल फिव्हरच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- गोपाल राठोड, प्रहार सेवक, सावरगाव