अकोला - लोकमत बाल विकास मंच बालमनाचा सच्चा सवंगडी नेहमीच लहान मुलांच्या सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कार्यरत असते. गेल्या काही दिवसांपासून बाल विकास मंचची सदस्यता नोंदणी सुरू असून, अकोलेकर बच्चे कंपनीकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच अनुषंगाने यावर्षीच्या नवीन सदस्यांकरिता आज गुरुवार, २१ ऑगस्ट २0१४ रोजी डीआयडी लिटल मास्टर फेम तनय मल्हार याच्या ह्यचाक धूम धूमह्ण या धमाल डान्स शो चे आयोजन सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. तरी सदर कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी बाल विकास मंच सदस्यांनी आपले सदस्यता ओळखपत्र लोकमत शहर कार्यालय, सेठी हाईट्स, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, अकोला येथे दाखवून कार्यक्रमाच्या फ्री पासेस घ्याव्यात, अशी विनंती आयोजकांमार्फत करण्यात आली आहे. तरी सदर कार्यक्रमास प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य असेल. तसेच खास पालकांच्या आग्रहास्तव बाल विकास मंचची सदस्यता नोंदणी लोकमत शहर कार्यालयात सुरू असून, अजूनही ज्या बालकांना नोंदणी करावयाची असेल त्यांनी त्वरित नोंदणी करून घ्यावी व फ्री गिफ्ट सोबतच वर्षभर होणार्या भरपूर कार्यक्रमांचा आनंद घ्या. अधिक माहितीकरिता लोकमत बाल विकास मंच संयोजक योगेश पाटील 9970457760 यांच्याशी संपर्क साधावा. नोंदणीकरिता लोकमत शहर कार्यालय, सेठी हाईट्स, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, अकोला येथे संपर्क साधावा.
‘चाक धूम धूम धमाल डान्स शो’चे आयोजन
By admin | Updated: August 21, 2014 01:08 IST