शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ अभियंत्यावर कारवाईचे आदेश

By admin | Updated: August 22, 2015 01:02 IST

लोकमतच्या वृत्ताची दखल; गोपी ठाकरे यांची वसतिगृहाला भेट.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शिवनेरी वसतिगृहातील वीजपुरवठा खंडित झाल्याने येथील विद्यार्थी मागील पंधरा दिवसांपासून अंधारात राहत असल्याचे वृत्त लोकमतने शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य गोपी ठाकरे यांनी शिवनेरी वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली. तसेच संबंधितांना प्रकरणाची विचारणा करत विद्यापीठाचे मुख्य अभियंता रोडगे यांच्यावर कारवाईचे आदेश दिले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शिवनेरी वसतिगृहात मंगळवार ४ ऑगस्टपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांना तब्बल पंधरा दिवस अंधारात काढावे लागल्याचे वृत्त शुक्रवारी लोकमतने प्रकाशित केले. वृत्त पाहताच कृषी विद्यापीठातील वसतिगृह प्रमुखांनी वसतिगृहाची तपासणी केली. दुपारच्या दरम्यान विद्यापीठ कार्यकारी सदस्य गोपी ठाकरे यांनी वसतिगृहाला भेट दिली. दरम्यान, त्यांनी वसतिगृह प्रमुख तसेच इतर अधिकारी कर्मचार्‍यांना या प्रकरणी खरीखोटी सुनावली. यावेळी विद्यापीठाचे अभियंता रोडगे यांच्याबद्दल विचारण्यात आले असता ते सुट्टीवर असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. या नंतर त्यांनी वसतिगृहात देण्यात येणार्‍या सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांंसोबत समस्यांबाबत चर्चा केली असता विद्यार्थ्यांनी घडलेला प्रकार सांगितला. या चर्चेदरम्यान विद्यापीठातील रोहित्रामध्ये बिघाड असून, याकडे विद्यापीठ अभियंत्यांनी लक्ष दिले नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश यावेळी त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. तसेच वीजपुरवठा त्वरित सुरळीत करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी अधिकार्‍यांना दिले. एकंदरीत लोकमतच्या वृत्ताची दखल घेत शिवनेरी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या गंभीर समस्या निकाली लावून विद्यार्थ्यांंना न्याय मिळाला. त्यामुळे विद्यार्थ्यांंमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.