शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीत समिती, व्यापारी, दलालांच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: April 26, 2017 01:34 IST

मानकर यांच्यावर गुन्हे दाखल केल्याचाही विचारला जाब

अकोला : बाजारात कमी दराने तूर खरेदी करून तीच तूर नाफेडच्या बाजार समितीतील केंद्रावर विक्री झाल्याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी, दलालांची चौकशी करण्याचे आदेश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. सोबतच केवळ जाब विचारल्यावरून भारत कृषक समाजाचे अध्यक्ष प्रकाश मानकर यांच्यावर गुन्हे का दाखल केले, याचीही चौकशी करण्याचे आदेश आहेत. शेतकऱ्यांना यावर्षी तुरीचे चांगलेच उत्पादन झाले; मात्र बाजार समितीमध्ये तुरीला पुरेसा भाव नसल्याने नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. प्रत्यक्षात बाजार समितीमधील व्यापारी आणि नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना चांगलेच रडकुंडीला आणले.बाजारात कमी दराने तूर खरेदी करून तीच तूर नाफेडच्या केंद्रात विकण्याचा सपाटाच व्यापारी, दलाल, कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापनाने लावला. संगनमताने हा प्रकार करण्यात आला, त्यामुळे या प्रकाराची तक्रार भारत कृषक समाजाचे अध्यक्ष प्रकाश मानकर यांनी केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने केली. त्याची दखल घेत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा उपनिबंधकांना चौकशीचे आदेश दिले. अशी होणार चौकशीकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमी दराने तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्या तुरीचे काय केले, कमी दराने खरेदी करणाऱ्यांवर बाजार समितीने कोणती कारवाई केली, नाफेडमध्ये तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून कोणाला पैसे दिले गेले, याची सखोल तपासणी उपनिबंधकांकडून केली जाणार आहे. त्यामध्ये दोषी आढळणारांवर तत्काळ कारवाई करण्याचेही बजावले आहे.जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाजपेयींची चौकशीबाजार समितीमध्ये नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याने त्यांच्या बोलावण्यावरून तेथे गेलेले भारत कृषक समाजाचे अध्यक्ष प्रकाश मानकर यांनी तक्रारीतून केवळ जाब विचारला असताना त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले, याप्रकरणी महाराष्ट्र स्टेट को-आॅप मार्केटिंग फेडरेशनचे मार्केटिंग अधिकारी मनोज वाजपेयी यांचीही चौकशी करण्याचे आदेश सहकार मंत्री देशमुख यांनी दिले आहेत.तुरीची कमी दराने खरेदी करणारे ८८ व्यापारीअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उघडपणे कमी दराने तुरीची खरेदी करणारे ८८ व्यापारी आहेत. त्यांची यादीही तक्रारीसोबत देण्यात आली. सोबतच ज्या शेतकऱ्यांनी कमी दराने तुरीची विक्री केली, त्या २०० जणांची यादीही देण्यात आली. त्यांच्यावर बाजार समितीने कोणतीच कारवाई केली नाही. नाफेडच्या तूर खरेदीमध्ये झालेल्या प्रकाराच्या तक्रारीवरून सहकार मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सहकार विभागाकडून लवकरच चौकशी सुरू केली जाईल. - जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला.