शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विश्रामगृहाच्या उद्घाटनाचा मुहूर्तच मिळेना!

By admin | Updated: June 12, 2017 19:42 IST

चोहोट्टा बाजार येथील प्रकार : ३५ लाख रुपयांचा खर्च करून उभारले विश्रामगृह

लोकमत न्यूज नेटवर्कचोहोट्टा बाजार : चोहोट्टा बाजार येथील मुख्य मार्गावर ३५ लाख रुपये खर्च करून विश्रामगृहाची भव्य इमारत उभारण्यात आली. परंतु, या विश्रामगृहाच्या उद्घाटनासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याने, नवीन इमारत दोन वर्षांपासून धूळ खात पडून आहे.चोहोट्टा बाजार येथील दुय्यम कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील विश्रामगृहाची जुनी इमारत ही पूर्णत: क्षतिग्रस्त झाली होती. ती पडल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नव्हती. याबाबत ह्यलोकमतह्णमधून वारंवार वृत्त प्रकाशित करून नवीन विश्रामगृह बांधण्यात यावा, यासाठी पाठपुरावा करण्यात आला. याबाबीची जिल्हा परिषदेतील तत्कालीन सदस्य रमेश म्हैसने यांनी दखल घेत जि.प.च्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा सातत्याने उचलून धरला. त्यांच्या प्रयत्नांची फलश्रुती म्हणून चोहोट्टा बाजार येथे नवीन विश्रामगृह बांधण्यासाठी शेष फंडातून ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या मागणीला जि.प.तील एकाही पदाधिकाऱ्याने कधीही विरोध केला नाही, हे विशेष. ह्यलोकमतह्णचा पाठपुरावा आणि रमेश म्हैसने यांच्या प्रयत्नाने नवीन इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे; परंतु या इमारतीच्या उद्घाटनासाठी जि.प. प्रशासनाला वेळ सापडत नसल्याने आज ही इमारत निरुपयोगी ठरली आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देऊन विश्रामगृहाच्या उद्घाटनासाठी मुहूर्त काढावा, अशी मागणी होत आहे.शंकरराव पाटलांचा मोठेपणा..विश्रामगृह बंधकामासाठी आपल्या मालकीची लाखो रुपयांची जागा प्रशासनाला दान देऊन येथील शेतकरी नेते शंकरराव पाटील बुंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे. त्यांच्या या मोठेपणाबद्दल आजही सर्व स्तरातून कौतुक होत आहे.शंकरराव पाटलांनी दान दिलेली जागा व्यर्थ जाऊ नये, यासाठी मी जि.प.मध्ये सातत्याने पाठपुरावा केला आणि नवीन विश्रामगृह बांधण्यासाठी ३५ लाख रुपये मंजूर करून घेतले.- रमेश म्हैसने, तत्कालीन सदस्य, जि.प. अकोला.कर्मचाऱ्यांअभावी उद्घाटन रखडले आहे. या विश्रामगृहाचे लवकरच उद्घाटन व्हावे, यासाठी प्रयत्न करू.- संध्याताई वाघोडे, अध्यक्ष जि.प. अकोला.