शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ५५ गावांनाच मिळणार दुष्काळी मदत

By admin | Updated: December 30, 2015 02:13 IST

अकोला जिल्ह्यातील ९४२ दुष्काळग्रस्त गावं मदतीपासून वंचित.

अकोला: राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र शासनामार्फत ३१00 कोटी रुपयांची मदत मंगळवारी जाहीर करण्यात आली असली तरी त्यामध्ये नजरअंदाज पैसेवारीनुसार ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्यातील केवळ ५५ गावांनाच या दुष्काळी मदतीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सुधारित पैसेवारीनुसार ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्यातील उर्वरित दुष्काळग्रस्त ९४२ गावांचे काय, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र शासनामार्फत ३१00 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. यावर्षीच्या खरीप हंगामात ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या राज्यातील १४ हजार ७0८ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून सवलती लागू करण्याचा निर्णय शासनामार्फत गत २0 ऑक्टोबर रोजी घेण्यात आला होता. शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त गावांच्या यादीमध्ये नजरअंदाज पैसेवारीनुसार अकोला जिल्ह्यातील ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या केवळ ५५ गावांचा समावेश आहे. त्यानंतर गत ७ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील खरीप पिकांच्या सुधारित पैसेवारीनुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यातील लागवडीयोग्य सर्व ९९७ गावांची सरासरी पैसेवारी ४२ पैसे म्हणजेच ५0 पैशांपेक्षा कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच गावांमधील दुष्काळी परिस्थितीवर शिक्कामोर्तब झाले आहे; परंतु शासनामार्फत गत ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त गावांच्या यादीमध्ये नजरअंदाज पैसेवारीनुसार ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्यातील केवळ ५५ गावांचाच समावेश आहे. सुधारित पैसेवारीनुसार जिल्ह्यातील उर्वरित दुष्काळग्रस्त ९४२ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असली तरी शासनामार्फत ही गावे अद्यापही दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे केंद्र शासनामार्फत राज्यातील दुष्काळ निवारणासाठी ३१00 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असली तरी या मदतीचा लाभ जिल्ह्यातील केवळ ५५ गावांमधील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना होणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील उर्वरित दुष्काळग्रस्त ९४२ गावांना शासनाच्या दुष्काळी मदतीचा लाभ केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.