शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख क्विंटल तूर मोजमापाविना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 01:36 IST

अकोला : हमी दराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी २२ एप्रिलपासून बंद करण्यात आली असली, तरी गत दीड महिन्यांपासून जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रांवर २ लाख ५८ हजार क्विंटल तूर मोजमापाविना पडून आहे.

तूर खरेदी बंद : तूर उत्पादक शेतकरी हवालदिल

अकोला : हमी दराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी २२ एप्रिलपासून बंद करण्यात आली असली, तरी गत दीड महिन्यांपासून जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रांवर २ लाख ५८ हजार क्विंटल तूर मोजमापाविना पडून आहे. नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आली आणि बाजारात तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने, तूर उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत प्रतिक्विंटल ५ हजार ५० रुपये हमीदराने नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यात येत होती. जिल्ह्यात अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांसाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या एका खरेदी केंद्रावर आणि अकोट, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व तेल्हारा या चार ठिकाणी खरेदी केंद्रांवर नाफेडद्वारे तूर खरेदी करण्यात येत होती. खरेदी केंद्रांवर तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत असताना, तूर खरेदीची प्रक्रिया मात्र संथ गतीने सुरू होती. बारदान्याचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या असल्याने, दीड महिना उलटूनही तुरीच्या मोजमापासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली. तुरीच्या मोजमापासाठी शेतकरी प्रतीक्षेत असतानाच, शनिवार, २२ एप्रिल रोजी सायंकाळपासून नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आली. नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आल्याने जिल्ह्यातील पाचही तूर खरेदी केंद्रांवर मोजमापाच्या प्रतीक्षेत तुरीचे ट्रॅक्टर उभे आहेत. २२ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रांवर नाफेडद्वारे २ लाख ५८ हजार ६७१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असून, तूर खरेदी बंद करण्यात आल्यानंतर खरेदी केंद्रांवर १ लाख ५ हजार २५0 क्विंटल तूर मोजमापाविना पडून आहे. नाफेडद्वारे खरेदी बंद करण्यात आली असून, बाजारात व्यापाऱ्यांकडून तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने, तूर कुठे विकणार, या चिंतेत शेतकरी हवालदिल झाला आहे.