शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जुने शहरवासीयांना रस्ताच सापडेना!

By admin | Updated: July 13, 2016 01:53 IST

परिसर जलमय; पश्‍चिम झोनमध्ये नाले सफाईची पोलखोल.

अकोला: शहरात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अकोलेकरांची चांगलीच तारांबळ उडाली असून जुने शहरात साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी पालिका प्रशासनाने पर्यायी व्यवस्थाच न केल्यामुळे रस्त्यातून वाट शोधताना नागरिकांच्या नाकीनऊ आले आहेत. यामुळे प्रशासनाने पश्‍चिम झोनमध्ये केलेल्या नाले सफाईवर प्रश्नचिन्हे उपस्थित होत आहेत. महापालिका प्रशासनाने यंदा प्रथमच प्रशासकीय स्तरावर शहरातील नाले, गटारांची मॉन्सूनपूर्व साफसफाई करण्याची जबाबदारी चारही क्षेत्रीय अधिकार्‍यांवर सोपवली होती. मनपा कर्मचार्‍यांचा ८ जून रोजी बेमुदत संप संपुष्टात आल्यानंतर क्षेत्रीय अधिकार्‍यांनी नाले सफाईला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच पश्‍चिम झोनमधील नाले सफाईच्या कामांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अकोलेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पश्‍चिम झोनमध्ये थातूर-मातूर नाले सफाई केल्यामुळे पावसाचे साचलेले पाणी ठिकठिकाणी साचले आहे. डाबकी रोड परिसरातील चिंतामणी नगर, सोपीनाथ नगर, मेहरे नगर, श्री राम चौक, रेणुका नगर, गोडबोले प्लॉट, वानखडे नगर, भगतवाडी,अयोध्या नगर, गायत्री नगर आदी परिसरात पावसाचे पाणी साचले असून नागरिकांच्या घरांना पाण्याने वेढा घातल्याचे चित्र आहे. नाले-गटारांमधील घाण पाणी सखल भागातील नागरिकांच्या घरापर्यंंंत पोहोचले आहे. गुडघाभर पाण्यातून वाट काढताना जुने शहरवासीयांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. जुने शहर जलमय! नाले सफाईचा बोजवारा उडाल्याने पावसामुळे जुने शहर जलमय झाल्याचे चित्र आहे. शाळकरी चिमुकल्या मुलांना काखेत घेऊन महिलांना रस्त्यातून वाट काढावी लागत आहे. वयोवृद्ध नागरिकांनी घराबाहेर निघणे बंद केल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी ऑटोचालक या भागात येण्यास तयार होत नसल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी नगरसेवकांसह पालिका प्रशासन कोणतेही ठोस उपाय करीत नसल्यामुळे नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण आहे.