शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अधिका-यांची दिवाळी; शहरात कच-याचे ढीग !

By admin | Updated: November 13, 2015 02:04 IST

अकोला महापालिकेचा साफसफाईला ठेंगा

अकोला: ऐन दिवाळीच्या दिवसात शहरात साफसफाई, स्वच्छता असणे आवश्यक असताना महापालिकेच्या दुर्लक्षामुळे मुख्य रस्त्यांवरच कचर्‍याचे ढीग साचले आहेत. आरोग्य विभागाने गुरुवारी मुख्य रस्त्यांसह सार्वजनिक ठिकाणांच्या साफसफाईला ठेंगा दाखविल्याने केळीच्या पानांसह विविध प्रकारची फुले व गवत विखुरल्याचे आढळून आले. तर संबंधित अधिकारी दिवाळीत मश्गुल असल्याचे समोर आले. अकोलेकरांच्या खिशातून वसूल होणार्‍या करातून मनपा कर्मचार्‍यांचे वेतन अदा केले जाते. या बदल्यात सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधांची पूर्तता करणे मनपा प्रशासनाचे नैतिक कर्तव्य आहे. हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. साहजिकच, या सणाचे महत्त्व लक्षात घेता शहरात साफसफाई, पथदिवे आणि पाणीपुरवठय़ाची यंत्रणा कार्यरत असणे अपेक्षित आहे. या ठिकाणी नेमका उलटा प्रकार दिसून येत आहे. दिवाळीच्या पर्वावर विविध साहित्य-वस्तूंची विक्री करण्यासाठी किरक ोळ व्यावसायिकांनी रस्त्यांलगत बाजार मांडला होता. यामध्ये प्रामुख्याने गांधी रोड, सिटी कोतवाली चौक, टिळक रोड, जैन मंदिर परिसर, गांधी चौक ते तहसील चौक, खुले नाट्यगृह ते काश्मिर लॉज, खुले नाट्यगृह ते धिंग्रा चौकाचा समावेश होता. दिवाळीच्या दिवशी सायंकाळी लघू व्यावसायिकांनी बाजार गुंडाळल्यानंतर रात्री किंवा गुरुवारी सकाळी संबंधित ठिकाणची साफसफाई करणे क्रमप्राप्त होते. गुरुवारी दिवसभर या ठिकाणी साफसफाईसाठी कोणीही फिरकले नसल्याने मुख्य रस्त्यांवर केरकचर्‍याचे ढीग साचल्याचे चित्र समोर आले. थकीत वेतनासाठी प्रशासनाकडे वारंवार निवेदन देणार्‍या सफाई कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना यानिमित्ताने कर्तव्याचा विसर पडल्याची टीका होत आहे.