शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

हिशेब न ठेवल्याने पदाधिकारी संतप्त!

By admin | Updated: April 13, 2017 01:50 IST

अकोला : जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत तिमाही जमा-खर्चाचा हिशेब ठेवणे कायद्याने बंधनकारक असताना गेल्या दोन वर्षात तसे झाले नाही.

गेल्या काळात हिशेब न ठेवणारांवर कारवाईची मागणी

अकोला : जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत तिमाही जमा-खर्चाचा हिशेब ठेवणे कायद्याने बंधनकारक असताना गेल्या दोन वर्षात तसे झाले नाही. त्या हिशेबाला मंजुरीही घेण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सभापती पुंडलिकराव अरबट यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी लावून धरली. त्यावर कोणताच निर्णय न घेता अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी सभा संपल्याचे जाहीर केल्याने क्षणभरात काय झाले, याचा उलगडा सभागृहात कोणालाच झाला नाही.स्थायी समितीची सभा अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्यासह उपाध्यक्ष जमिरउल्लाखा पठाण, सभापती पुंडलिकराव अरबट, रेखा अंभोरे, माधुरी गावंडे, देवका पातोंड यांच्या उपस्थितीत सुरू झाली. सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर अनुपस्थित होत्या. त्यामुळे जमा-खर्चाच्या विषयावरून होणारे वादंग सभेपूर्वीच निवळले. जिल्हा परिषद अधिनियमातील कलम १०९ मधील परिच्छेद तीननुसार अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीच्या खर्चावर पर्यवेक्षण करण्याचा अधिकार स्थायी समितीला आहे. कामाची प्रगती, खर्चाचा नियत कालावधीत आढावाही घेण्याचे नमूद आहे; मात्र मुख्य लेखा व वित्त अधिकारी नागर यांनी दर तिमाही जमा-खर्चाचे विवरणपत्र गेल्या दोन वर्षात सादरच केलेले नाही. त्याच्या कार्यकाळात कधीही स्थायी समितीपुढे दर तिमाही जमा-खर्चाचे विवरणपत्र ठेवून मंजुरी घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या लेखा संहितेमध्ये कलम ६० नुसारही स्थायी समितीची मंजुरी घेणे बंधनकारक आहे; मात्र अर्थ किंवा स्थायी समितीपुढे सादरच केले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच अखर्चित रकमांचा घोळ वाढला आहे. हा मुद्दा सभापती अरबट यांनी मांडला. सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनीही अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार, हा मुद्दा लावून धरला. अध्यक्षांचेही अधिकारी ऐकत नाहीत !जिल्हा परिषदेतील अनेक अधिकारी अध्यक्षांचे ऐकत नाहीत. हेकेखोरपणा करतात. जिल्ह्यात पाणीटंचाईची कामे करण्यास कोणीही तयार नाही. हातपंप दुरुस्तीच्या कामांकडे प्रचंड दुर्लक्ष करण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सातत्याने फाइल परत पाठवली, असे प्रकार सुरू असल्याचे सदस्य पांडे, कोल्हे यांनी सभेत सांगितले. यावेळी सदस्य दामोदर जगताप, डॉ. हिम्मत घाटोळ, रामदास लांडे यांनीही विषय मांडले. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मागितली माफीआनंदीबाई जोशी पुरस्कार वितरण प्रक्रियेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरि पवार यांनी पदाधिकाऱ्यांना डावलल्याचा मुद्दा सदस्य विजय लव्हाळे यांनी मांडला. त्यावर चूक झाल्याचे मान्य करत डॉ. पवार यांनी सभागृहात माफी मागितली. कार्यकारी अभियंता गावंडे पोचले सभेतनिधी खर्चाच्या मुद्यावर विभागीय आयुक्तांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर, कार्यकारी अभियंता एस.जी.गावंडे यांना अमरावतीला सकाळी ११ वाजताच उपस्थित राहण्याचे बजावले. चर्चेनंतर ११.३० वाजता गावंडे अकोल्याकडे निघाले; मात्र नागर आल्याच नाहीत. त्यांना सभेत बोलावण्याचा आग्रह सदस्यांनी धरला. पंचायत राज समितीपुढे उपोषण करणारजिल्हा परिषदेत निधी खर्च करण्याची पद्धत ठरली आहे. त्यानुसार ३० सप्टेंबरपर्यंत पदाधिकाऱ्यांनी निधी खर्च न केल्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तो खर्च करावा लागतो. जिल्हा परिषदेत तसे झाले नाही. त्यासाठी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी पंचायत राज समितीच्या दौऱ्यादरम्यान उपोषण करण्याचा इशारा सदस्य गोपाल कोल्हे यांनी दिला.