शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिकांचा परीक्षेवर बहिष्कार!

By admin | Updated: July 18, 2016 02:19 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आंदोलन; परीक्षा रद्द करण्याची मागणी.

अकोला: सार्वजनिक आरोग्य विभागातील बंधपत्रित परिचारिकांना शासन सेवेत नियमित करण्यासाठी शासनाकडून रविवार, १७ जुलै रोजी घेण्यात आलेल्या सरळसेवा भरती परीक्षेवर अकोला मंडळाअंतर्गत येणार्‍या पाच जिल्हय़ातील ५१२ पैकी ३९३ परिचारिकांनी बहिष्कार टाकला. ही परीक्षा रद्द करण्याची मागणी करीत परिचारिकांनी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आंदोलन केले व मागणीचे निवेदन प्रशासनाला सोपविले. दरम्यान, या परिचारिकांपैकी ११९ परिचारिकांनी रविवारी घेण्यात आलेली परीक्षा दिली.सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या राज्यभरातील बंधपत्रित परिचारिकांना शासन सेवेत समावून घेण्यासाठी शासनाने त्यांची विभागांतर्गत सरळसेवा भरती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला मात्र महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन या बंधपत्रित परिचारिकांच्या संघटनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. शासन सेवेत अखंडित २५ ते ३0 वर्षे सेवा दिल्यानंतर आता अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयाला विरोध करीत ही परीक्षा रद्द करण्याची मागणी संघटनेने केली आहे. त्यासाठी निवेदन, आंदोलन, निदर्शने करण्यात आली; परंतु परीक्षा रद्द करण्यात आली नाही. त्यामुळे या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेने घेतला. त्यानुसार अकोला येथे रविवारी ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षा रद्द करण्याची मागणी करीत पाच जिल्हय़ातून आलेल्या ५१२ परिचारिकांनी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आंदोलन केले व मागणीचे निवेदन सादर केले. त्यानंतर मात्र या परिचारिकांपैकी ११२ परिचारिकांनी परीक्षा दिली. उर्वरित ३९३ परिचारिका मात्र परीक्षा न देताच माघारी परतल्या.