शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

कामधेनू दत्तकग्राम योजनेतील गावाची संख्या घटली

By admin | Updated: January 22, 2016 01:23 IST

कामधेनू दत्तकग्राम योजनेत राज्यातील २४0२ गावांचा समावेश; ९४९ गावे कमी.

नीलेश शहाकार/बुलडाणा : जनावरांचे आरोग्य सुदृढ व्हावे, दुधाचे उत्पादन वाढावे, पशुपालकांची संख्या वाढून दर्जेदार उत्पादनासाठी दूध व पूरक उत्पादने वाढावे, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कामधेनू ग्राम दत्तक योजना राबवण्यात येते. चालू वर्षात राज्यातील २४0२ गावांसाठी ही योजना राबविली जात असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा ९४९ गावे कमी झाली आहे. शेतकर्‍यांच्या जनावरांचे आरोग्य सदृढ करणे व दुध उत्पादकतेत वाढ करुन ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी कामधेनू ग्राम दत्तक योजना राबविण्यात येते. यातून जनावरांमध्ये वांझपणावर उपाययोजना, गोचीड प्रतिबंध व निर्मूलन, जंतनिर्मूलन, मलमूत्र विसर्जनाची व्यवस्था, पशुपालक प्रबोधनात्मक सहल, सकस चारा निर्मिती, हायड्रोफोनिक किंवा अझोला चार्‍याची निर्मिती करणे, दूध उत्पादन वाढविणे, मूरघास प्रकल्प आदी उपक्रम राबविले जातात. ३00 पेक्षा जास्त पैदास सक्षम जनावरे असलेल्या गावांची अथवा दोन किंवा तीन गावे मिळून ३00 पेक्षा जास्त पैदास सक्षम जनावरे असल्यास त्या गावांची निवड केली जाते. २0१४-१५ मध्ये कामधेनू दत्तक योजनेसाठी ३३५१ गावाचा समावेश होता. २0१५-१६ मध्ये गावाच्या संख्येत घट झाली. यावर्षी २४0२ गावात ही योजना राबवण्यात येत असून, गतवर्षीच्या तुलनेत ९४९ गावे कमी करण्यात आली आहेत. पशुपालक मंडळ स्थापना रखडलीपशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त विद्यामाने बुलडाणा जिल्ह्यात ९५ गावांमध्ये कामधेनू ग्राम दत्तक योजना राबविली जात आहे. योजनेत सहभागी गावामध्ये ग्रामसमिती स्थापन करुन ग्रामसभेतून पशुपालक मंडळ स्थापन करणे आवश्यक आहे; मात्र अद्यापही बर्‍याच गावांमध्ये पशुपालक मंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया रखडल्यामुळे बरेच लाभार्थ्यांवर योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.