शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

आता सेकंदात माती परीक्षण

By admin | Updated: December 8, 2014 01:05 IST

डेव्हिड विनडॉर्फ यांचे संशोधन, कृषी विद्यापीठासोबत होणार करार.

राजरत्न सिरसाट /अकोलामाती परीक्षणाच्या पारंपरिक पद्धतीवर अमेरिकेने मात केली असून, उपग्रहाद्वारे सुमारे साठ सेकंदां तच परिपूर्ण अहवाल देणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. शेतकर्‍यांना शेतातील मातीचा सामू बघून कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, याचा ताळमेळ बसवून हमखास उत्पादनासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. या तंत्रज्ञानाचा वापर विदर्भात करण्यासाठीचा करार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासोबत केला असल्याची माहिती अमेरिकेच्या टेक्सास विद्या पीठात कार्यरत या तंत्रज्ञानाचे जनक तथा कृषी विज्ञान आणि नैसर्गिक संसाधन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता (संशोधन) डॉ. डेव्हिड सी. विनडॉर्फ यांनी खास ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी परिसंवादाला उपस्थित राहण्यासाठी डॉ. विनडॉर्फ अकोला येथे आले आहेत. याप्रसंगी माती परीक्षणाशिवाय शेती करू च नये, असे त्यांनी आर्वजून सांगितले.

प्रश्न- काय आहे माती परीक्षणाचे नवीन तंत्रज्ञान? उत्तर - माती परीक्षणाचे हे एक्सआरएफ तंत्रज्ञान आहे. मातीचा प्रत्यक्ष नमुना न घेता त्यामध्ये कोणते मूलद्रव्य कमी आहेत, हे केवळ साठ सेकंदांत सांगता येते आणि तीन तासांत जवळपास १८0 मातीचे नमुने या तंत्रज्ञानाने काढण्यात येतात.

प्रश्न - शेतात प्रामुख्याने कोणत्या घटकांची कमतरता आढळते?उत्तर - प्रामुख्याने शेतातील गंधक, जीप्सम आदी सर्वच घटकांसह मुख्य व दुय्यम अन्नद्रव्ये शोधली जातात.

प्रश्न- माती परीक्षण करणे गरजेचे आहे का ?उत्तर - होय, माती परीक्षण केले, तर मातीचा सामू कळतो. मातीत कोणते गुणधर्म कमी आहेत, हे समजते आणि त्या उपाययोजना करू न कोणती खते वापरावीत, याचे नियोजन करता येते. त्यामुळे तुमचा योग्य ते उत्पादन घेण्याचा मार्ग मोकळा होतो.

प्रश्न- हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी किती कालावधी लागला ?उत्तर - माती परीक्षणाचे तंत्रज्ञान आहेच, पण या नवीन यंत्राचा वापर वीस वर्षांंपूर्वी झाला होता. यामध्ये नवे संशोधन करण्यात आले असून, साठ सेकंदांत माती परीक्षणाचा अहवाल देण्याची सोय करण्यात आली आहे.

प्रश्न- जलतपासणीसाठी या तंत्रज्ञानाचा वापर होतो का ?उत्तर - होय, जलतपासणीसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. या तंत्रज्ञानामुळे पाण्याची शुद्ध ता तपासली जाते. पाण्यात कोणती जड तत्त्वे,जलप्रदूषक आहेत, हे लगेच कळते. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत होत असल्याने या तंत्रज्ञानाचा अमेरिकेत मोठय़ा प्रमाणात वापर होत आहे.

प्रश्न - पाण्यात दूषित घटक कोणते असतात?उत्तर - अनेक घटक आहेत. म्हणूनच या तंत्रज्ञानाद्वारे पाण्याची प्रत तपासली जाते. पाण्यातील हानिकारक तत्त्वे, सेंद्रिय कर्बाची माहिती क्षणार्धात कळते.

प्रश्न - या यंत्र तंत्रज्ञानाची किंमत किती आहे?उत्तर - माती परीक्षण तंत्रज्ञान यंत्राची किंमत ४0 हजार यूएस डॉलर म्हणजेच भारतीय किम तीनुसार २0, ८0,000 रुपये असून, पाण्यातील सेंद्रिय कर्ब तपासणी यंत्राची किंमत ८0 हजार यूएस डॉलर आहे. विशेष म्हणजे, या यंत्रात कोणत्याही रसायनाचा वापर न करता माती आणि पाण्याची तपासणी केली जाते. या यंत्राचा वापर विदर्भात करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. *६0 सेकंदात अहवाल अमेरिकेने उपग्रहाद्वारे सुमारे साठ सेकंदांतच परिपूर्ण अहवाल देणारे तंत्रज्ञान केले विकसित याव्दारे मातीतील अन्नद्रव्य शोधली जातात. गंधक, जीप्सम आदी सर्वच घटकांसह मुख्य व दुय्यम अन्नद्रव्यांची मातीतील स्थिती समजल्यामुळे आवश्यक ते अन्नद्रव्य दिल्या जावू शकते.