शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आता अकोल्यातील धार्मिक स्थळं ८ जानेवारीनंतर हटणार

By admin | Updated: January 5, 2016 02:00 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्य़ाचे प्रकरण कोर्टात.

अकोला: शहरातील धार्मिक स्थळं स्वत:हून काढण्यासाठी महापालिकेने संबंधित विश्‍वस्तांना ४ जानेवारीची मुदत दिल्यानंतर ५ जानेवारीपासून प्रशासनाकडून धार्मिक स्थळं हटविण्याची कारवाई होणार होती. या कारवाईला ८ जानेवारीनंतर सुरुवात केली जाणार आहे. यादरम्यान, वाशिम बायपास परिसरात उभारण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्य़ाप्रकरणी संबंधितांनी स्थानिक न्यायालयात धाव घेतली असून, मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. शहरात विविध धर्मियांची धार्मिक स्थळे आहेत. काही धार्मिक स्थळे नियमबाह्यरीत्या उभारण्यात आल्याने विकास कामे करताना महापालिका प्रशासनाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. काही बहाद्दरांनी चक्क रस्त्यालगत तसेच नाल्यांवर पूज्यनीय देवता, व्यक्तींचे पुतळे, प्रतिमा बसविल्या आहेत. अशा प्रतिमा, पुतळ्य़ांची रात्री-अपरात्री कोणतीही सुरक्षा नसल्याने समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबी लक्षात घेता, सर्वच प्रकारची धार्मिक स्थळे हटविण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश जारी केले आहेत. तसेच कारवाईचा अहवाल प्रत्येक पंधरा दिवसांनी सादर करण्याचे निर्देश आहेत. यानुसार मनपाने पहिल्या टप्प्यात २00९ नंतर उभारलेल्या धार्मिक स्थळांचा समावेश केला. संबंधित विश्‍वस्तांनी स्वत:हून धार्मिक स्थळं हटविण्यासाठी ४ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली. ५ जानेवारीनंतर शहरात झोननिहाय स्थळं हटविण्याची कारवाई करण्याचा आदेश मनपा आयुक्त अजय लहाने यांनी क्षेत्रीय अधिकार्‍यांना दिला होता. मात्र ५ जानेवारी रोजी काही अपरिहार्य कारणास्तव पोलीस बंदोबस्त उपलब्ध होऊ शकणार नसल्याचे पोलीस प्रशासनाने कळविले असून, स्वत: आयुक्त लहाने ८ जानेवारीपर्यंत बाहेरगावी असल्याची माहिती आहे. यामुळे किमान ८ जानेवारीपर्यंत धार्मिक स्थळे उभारणार्‍यांना किंचित दिलासा मिळाला आहे. पुतळा धार्मिक स्थळांमध्ये कसा? सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक स्थळे हटविण्याचा आदेश महापालिकेला दिलस आहे. २00९ नंतर उभारण्यात आलेल्या प्रशासनाच्या पहिल्या यादीत वाशिम बायपासस्थित सिद्धार्थ वाडीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्य़ाचा समावेश आहे. धार्मिक स्थळांच्या व्याख्येत पूज्यनीय व्यक्तींच्या पुतळ्य़ाचा समावेश होतो का, अशी विचारणा शहरातील नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे सोमवारी केली. तसेच या प्रकरणी स्थानिक न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली आहे. या प्रकरणी मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.