शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

आता राज्यातील सर्वच जंगल अतिसंवेदनशील

By admin | Updated: September 14, 2014 01:52 IST

चोवीस तास राहणार वॉच : वृक्षतोड रोखण्यासाठी निर्णय

विवेक चांदूरकर अकोला : वृक्षांची होत असलेली कत्तल व वन्य प्राण्यांच्या शिकारीवर कडक निर्बंध आणण्यासाठी आता वनविभाग सरसावले आहे. राज्यातील सर्वच जंगल अतिसंवेदनशील करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या जंगलांवर आता आठवड्यातील २४ तास वनकर्मचारी व अधिकार्‍यांचा वॉच राहणार आहे. जंगलांची होत असलेली तोड, व त्याचे दिसणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविधि उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्येच राज्यातील सर्वच जंगल आता अतिसंवदेनशील म्हणून घोषित करण्यात आले आहे. पूर्वी वनाची तीन भागात विभागणी करण्यात आली होती. यामध्ये सर्वसाधरण क्षेत्र, संवेदनशील व अतिसंवेदनशील क्षेत्र असे तीन प्रकार होते. आता सर्वसाधारण क्षेत्र व संवेदनशील क्षेत्र रद्द करण्यात आले असून, सर्वच क्षेत्र अतिसंवेदनशील करण्यात आले आहे. तशा सूचनाही संबंधीत वनविभागाच्या कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सहाजिकच वन कर्मचारी व अधिकार्‍यांच्या जबाबदार्‍याही वाढल्या आहेत. पूर्वी सर्वसाधारण व संवेदनशील क्षेत्र असलेल्या कर्मचार्‍यांवर जास्त ताण नव्हता. आता मात्र, बिट गार्डला दररोज बीट निरीक्षण करून नोंदी कराव्या लागतील. तसेच दैनंदिनीही प्रलंबित ठेवता येणार नाही. वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांना साहाप्तीक दैनंदिनी व वनसंरक्षकांना मासिक दैनंदिनी न चुकता सादर करावी लागणार आहे. सर्वच जंगलांच्या सीमा आखून, त्यावर खुणा करून त्या मजबुत कराव्या लागणार आहे. अतिसंवेदनशील जंगल अखत्यारित असलेल्या वन व वन्यजीव विभागाच्या कार्यालयातील उपवनसंरक्षकापासून तर बिट गार्डपर्यंत सर्वांच्याच जबाबदार्‍या वाढल्या आहेत. ** बिट गार्ड, वनकर्मचारी नेहमीच गस्तीवर सर्वच जंगले अतिसंवेदनशील झाल्यामुळे आता बिट गार्ड व वन कर्मचार्‍यांना नेहमीच गस्तीवर राहावे लागणार आहे. आपल्या अखत्यारित असलेल्या जंगलात येणार्‍या जाणार्‍यांच्या नोंदी घेणे, जंगल परिसराची नियमित पाहणी करून त्याचा दैनंदिन अहवालही त्यांना सादर करावा लागणार आहे.