शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

आकोट मतदारसंघातील उमेदवारांना नोटीस

By admin | Updated: October 11, 2014 00:40 IST

चौघांना कारणे दाखवा नोटीस तर दोन कोतवाल निलंबित.

आकोट (अकोला): आकोट विधानसभा निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी निवडणूक दैनंदिन खर्चाचे विवरण पत्र ११ ऑक्टोबरपर्यंत सादर न केल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ अन्वये आचारसंहितेचा भंग करीत असल्याच्या कारणावरून कारवाई करण्यात येणार असल्याच्या नोटीस १८ उमेदवारांना देण्यात आल्या असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.निवडणूक खर्च निरीक्षक यांनी यापूर्वी सभा बोलाविली असता सर्व उमेदवारांनी आपला खर्च अद्ययावत करून तपासणीस सादर करण्याबाबत निर्देश दिले होते; परंतु अद्यापही उमेदवारांनी आपला खर्च सादर न केल्यामुळे ११ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते ५ या वेळात निवडणूक खर्च लेखा पथक यांच्याकडे सादर करावे, अशा आशयाच्या नोटीस निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व उमेदवारांना बजावल्या आहेत. उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक खर्च सादर न केल्यास आचारसंहितेच्या सदराखाली गुन्हे दाखल होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. *चौघांना कारणे दाखवा नोटीसनिवडणूक निरीक्षक (खर्च) निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार उल्लंघन करून निवडणूक कामात दिरंगाई केल्याबाबत आपले स्पष्टीकरण सादर करावे अन्यथा का कारवाई करण्यात येऊ नये, अशा आशयाच्या कारणे दाखवा नोटीस निवडणूक निर्णय अधिकारी यांनी एस.एस. धुर्वे, पी.एम. बनसोड, डी.डी. वक्ते यांना बजावल्या आहेत तर आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात दिरंगाई करीत असल्याप्रकरणी ए.पी. साल्पेकर यांनासुद्धा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच आचारसंहिता अनुपालन करण्यासंबंधी उमेदवार अथवा राजकीय पक्ष यांचा अहवाल सादर करण्याबाबत भरारी पथक प्रमुख एन. पी. नेमाडे, व्ही. जी. इंगोले यांनासुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत. *दोन कोतवाल निलंबित विधानसभा निवडणुकीत आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे आकोट महसूल विभागातील जऊळकाचे कोतवाल आसिफशाह मन्नासशाह व आकोलखेडचे कोतवाल नारायण मोतीराम तायडे यांचेवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.