शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय नाय तर वेतन नाय!

By admin | Updated: November 28, 2015 02:35 IST

स्वच्छता प्रमाणपत्रासाठी शिक्षकांची मनपात धाव.

नितीन गव्हाळे/ अकोला: भारत स्वच्छता अभियानांतर्गत ग्रामीण भागासह शहरी भागामध्येसुद्धा हगणदरीमुक्तीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांंंमधून सुशिक्षित समाज घडविण्यासाठी त्यांना धडे देणार्‍या शिक्षकांकडेसुद्धा शौचालय आहे की नाही, याची खात्री करून घेण्यासाठी शहरी भागातील जिल्हा परिषद, खासगी शाळांमधील शिक्षकांना स्वच्छता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. शिक्षकाकडे ह्यशौचालय नाय. तर वेतन नाय..ह्ण अशीच भूमिका आता प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे स्वच्छता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शिक्षक महापालिकेत धाव घेत आहेत. शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक म्हणून गणला जातो. समाजाला दिशा देण्याचे काम शिक्षकांच्याच माध्यमातून होते; परंतु त्यांच्याच घरी शौचालय नसेल, तर समाजाने कोणता धडा घ्यावा? शिक्षक ही जबाबदार व्यक्ती असल्याने, त्यांच्या घरी शौचालय आहे की नाही, याबाबत पडताळणी शिक्षण विभागाने हाती घेतली आहे. घरात शौचालय असल्याचे सप्रमाण सिद्ध करा आणि वेतन घ्या, अशीच भूमिका शिक्षण विभागाने घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शिक्षण विभागाच्या या भूमिकेमुळे शहरी भागात राहणार्‍या शिक्षकांनी घरी शौचालय असल्याचे स्वच्छता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महापालिकेत धाव घेतली आहे. महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागात जाऊन शहरातील शिक्षक प्रमाणपत्र देण्याची विनंती करीत आहेत. आम्हाला वेतनापासून वंचित राहावे लागेल, अशी गळ ते अधिकार्‍यांना घालत आहेत. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकविणार्‍या शिक्षकांनासुद्धा नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायतकडून स्वच्छता प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. स्वच्छता प्रमाणपत्र शिक्षण विभागात जमा केल्याशिवाय शिक्षकांचे वेतनच त्यांच्या खात्यात जमा होणार नसल्याने, स्वच्छता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शिक्षकांची एकच गर्दी होत आहे. शिक्षक उघड्यावर शौचास जात असल्याचे आले निदर्शनास ग्रामीण भागातील शिक्षक राहत्या ठिकाणी वैयक्तिक शौचालयाचा वापर करीत नसून, उघड्यावर शौचास बसून सार्वजनिक आरोग्यास बाधा पोहोचवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने प्रशासनाने याबाबत कठोर निर्णय घेतला. त्यानुसार, घरी शौचालय आहे की नाही, याची खात्री पटविण्यासाठीच प्रत्येक शिक्षकाला स्वच्छता प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे.