शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

हे कसले फिजिकल डिस्टन्सिंग? कोरोना चाचणी आणि अहवालासाठीही रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 10:48 IST

Coronavirus in Akola चाचणी केंद्रांवर रांगा लागत असल्याने या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडत आहे.

ठळक मुद्देतपासणी केंद्रांवर संदिग्ध रुग्णांची गर्दीकोरोना प्रतिबंधक नियमांना बगल

अकोला : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून, दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने कोरोना चाचणी करून घेणाऱ्यांची संख्या वाढली असून, शहरातील सर्वच चाचणी केंद्रांवर संदिग्ध रुग्णांची गर्दी होत आहे. चाचणी केंद्रांवर रांगा लागत असल्याने या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडत आहे. चाचणी झाल्यानंतर अहवाल घेण्यासाठीही रांगाच लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार राेखणार कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गतवर्षी डिसेंबर महिन्यात उतरणीला लागलेला कोरोनाचा आलेख यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा वरच्या दिशेने आगेकूच करत आहे. शासन मान्य करीत नसले, तरी समूह संसर्ग सदृशस्थिती निर्माण झाली असून, बाधित होणाऱ्यांची दैनंदिन आकडेवारी जुने विक्रम मोडत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हायरिस्क संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे. नागरिकांमध्येही जागृती आल्याने स्वत:हून चाचणी करून घेणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आयएमए हॉल, मनपाचे भरतीया रुग्णालयास विविध तपासणी केंद्रांवर चाचणीसाठी येणाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. या सर्वच केंद्रांमध्ये रांगा लागत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. कोरोना संसर्ग चाचणी केल्यानंतर अहवाल मिळविण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कक्षासमोरही संदिग्ध रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांची दररोजच मोठी रांग लागलेली असते. रांगेत दोन दोन तास उभे राहूनही अनेकांना वेळेवर अहवाल प्राप्त होत नाहीत. या रांगांमध्ये कोणत्याही प्रकारचे कोरोना प्रतिबंधक नियम पाळल्या जात नसल्याने या रांगा कोरोनाचा संसर्ग वाढविण्यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तपासणी केंद्रावर कोरोना चाचणी करण्यासाठी आलो होतो. या ठिकाणी गर्दी पाहून चाचणी न करताच परत जाण्याचा विचार करत आहे. उद्या किंवा परवा सकाळी लवकर येऊन चाचणी करून घेईल.

 

-आत्माराम बोडखे, अकोला

 

सामान्य सर्दी, ताप झाल्यामुळे चार दिवस रजेवर होतो, आता कार्यालयात रुजू होण्यासाठी कोरोना चाचणी अनिवार्य असल्याने चाचणी करण्यासाठी आलो आहे. तपासणी केंद्रावर मोठी गर्दी असून, अनेकांनी मास्कही घातलेले नाहीत. त्यामुळे या गर्दीत उभे राहिल्यास संसर्ग होण्याची भीती वाटत आहे.

 

-सदाशिव राऊत, अकोला

 

पाच दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग चाचणी करून घेतली. अजूनपर्यंत मोबाइलवर कोणताही मेसेज आला नाही. त्यामुळे अहवाल घेण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कक्षासमोर रांगेत उभे राहावे लागत आहे.

-सुनील बोरेकर

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या