शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका सभागृह नव्हे, आखाडा!

By admin | Updated: July 1, 2016 02:07 IST

माइकची तोडफोड, बाचाबाची : रस्ता अनुदानाच्या ५ कोटी ७५ लाखांच्या निधीवरून विरोधकांचा गोंधळ.

अकोला: रस्ता अनुदानासाठी प्राप्त ५ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधी वाटपावरून काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड, भारिप-बमसचे गटनेता गजानन गवई यांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. माइकची तोडफोड, पीठासीन अधिकारी उज्ज्वला देशमुख, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल करून विरोधकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची प्रतिष्ठा पायदळी तुडवल्याचे चित्र गुरुवारी पाहावयास मिळाले. महापालिकेला रस्ता अनुदानापोटी प्राप्त ५ कोटी ७५ लाखाचे वाटप करणे, एलईडीसाठी मंजूर १0 कोटी रुपयांमध्ये १४ व्या वित्त आयोगातून १0 कोटीचा हिस्सा जमा करण्यासह विविध विषयांवर मुख्य सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला सुरुवात होताच रस्ता अनुदानाच्या तयार यादीवरून भारिपचे गटनेता गजानन गवई यांनी आक्षेप नोंदवला. निधी वाटपात सत्ताधारी भेदभाव करीत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. गवई यांच्या दिमतीला काँग्रेसचे नगरसेवक मदन भरगड धावून आले. सत्ताधार्‍यांच्या पक्षपाती धोरणामुळे शहराचे वाटोळे झाल्याचा आरोप गजानन गवई, भरगड यांनी केला. यादरम्यान सभापती विजय अग्रवाल यांनी विकास कामांच्या मंजूर निधीचे वाचन सुरू करताच विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. भारिपच्या गटनेत्यांसह नगरसेवकांनी विजय अग्रवाल यांच्या हातातील माइक हिसकण्याचा प्रयत्न केला. तर मदन भरगड यांनी चक्क प्रशासनाचा कॅमेरा हिसकावून घेतला. गदारोळ वाढत असल्याचे पाहून महापौर उज्ज्वला देशमुख यांनी काही वेळासाठी सभा स्थगित केली. दहा मिनिटानंतर सभा सुरू होताच विषयांचे वाचन करून आणि बैठकीतील विषयांना मंजुरी देऊन महापौरांनी सभा आटोपती घेतली.