शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांवरील अत्याचार रोखणा-यास ‘निर्भय’ पुरस्कार!

By admin | Updated: June 26, 2015 01:52 IST

चंद्रकिशोर मीना यांनी दिली विविध उपक्रमांबद्दल माहिती.

अकोला : महिलांवरील अत्याचाराविरुद्ध कामगिरी करणार्‍या नागरिकांसाठी राज्य शासनाच्या वतीने 'निर्भय' पुरस्कार देण्यात येणार आहे. त्या अनुषांगाने जिल्ह्यातील नागरिकांनी महिलांवर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध लढा देऊन पोलीस प्रशासनास सहाकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस निरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी केले आहे. पोलीस प्रशासनातर्फे राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांबद्दल माहिती देण्यासाठी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनातर्फे राबविण्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती देऊन नागरिकांना आपला सहभाग वाढविण्याचे आवाहन केले. महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या ह्यनिर्भयह्ण पुरस्काराविषयी यावेळी त्यांनी माहिती दिली. तसेच नागरिकांनी समोर येऊन महिलांवर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले. असे कार्य करणार्‍या व्यक्तीच्या नावाचा प्रस्ताव ह्यनिर्भयह्ण पुरस्कारासाठी पाठविण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये रोख आणि प्रशस्तिप्रत्रक असे राहणार आहे. तेव्हा नागरिकांनी आपला सहभाग वाढवून महिलांवरील होणार्‍या अत्याचाराला शमविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी मीना यांनी केले. तसेच १ जुलैपासून जिल्ह्यात 'मुस्कान' नावाचा नवीन उपक्रमदेखील पोलील प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील भिकारी, मार्केटमध्ये काम करणारे मुले, रेल्वे स्थानक, बस स्थानकावरील मुलांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा फायला मिसिंग चाईल्ड शोधण्यासाठी होणार असल्याचे मीना यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.