अ. भा. ट्रान्सपाेर्ट असाेसिएशनच्या निमंत्रकपदी मजहर खान
अकाेला ऑल इंडिया माेटर ट्रान्सपाेर्ट असाेसिएशनच्या निमंत्रकपदी मजहर खान यांची नियुक्ती करण्यात आली महजर खान हे गेल्या दहा वर्षांपासून ट्रान्सपाेर्ट असाेसिएशनचे जिल्हाध्यक्षम्हणून कार्यरत आहेत त्यांच्याच नेतृत्वात ट्रान्सपाेर्ट असाेसिएशनने ट्रान्सपाेर्ट चालकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत हे विशेष.
जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी लोकशाही सभागृहात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, संतोष कानडे, अभय राठोड, नीलेश दामोदर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी- अधिकारी उपस्थित होते.
वयोवृद्ध व्यक्तींसाठी प्रशिक्षण
अकोला - सहायक आयुक्त समाजकल्याण, अकोला यांच्या कार्यालयामार्फत वयोवृद्ध व्यक्तींचे आयुष्य आनंदी करता यावे यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. सावली, सीएफएआर, हेल्प्ज इंडिया, फेसकॉम व एएससीओपी या संस्थांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.ज्येष्ठत्वाची ओळख, ज्येष्ठ व्यक्तींना भेडसावणाऱ्या समस्या व उपाययोजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या कायद्याची ओळख, ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या योजनांची ओळख या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण ३० व्यक्तींना देण्यात येणार आहे अशी माहिती सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी दिली आहे.
प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ शास्त्री स्टेडियम येथे
अकोला - भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनाचा जिल्ह्याचा मुख्य शासकीय समारंभ मंगळवार २६ रोजी सकाळी सव्वानऊ वाजता लालबहादूर शास्त्री स्टेडियम अकोला येथे होणार आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे. या समारंभात राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन होणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी साडेआठ वाजता ध्वजवंदन होईल,असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कळविले आहे.