अकोला: शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत सोमवारी अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये अकोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) डी.एस. बचुटे यांची अकोला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) या पदावर बदली करण्यात आली आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या आदेशावरून विभागांतर्गत राज्यातील १५ अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अकोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वर्ग-१ डी.एस. बचुटे यांची अकोला येथेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामन्य प्रशासन) या रिक्त पदावर बदली करण्यात आली. लाचखोरीच्या प्रकरणात दोन महिन्यांपूर्वी या पदावरील जावेद इनामदार यांना निलंबित करण्यात आले. तेव्हापासून हा प्रभार आकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के.आर. तापी सांभाळत आहेत. या रिक्त पदावर बचुटे यांची बदली करण्यात आली असून, मंगळवारी ते पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
बचुटे जिल्हा परिषदेचे नवे ‘डीसीईओ’
By admin | Updated: December 29, 2015 02:21 IST