शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

नजरअंदाज पैसेवारी पुन्हा होणार जाहीर

By admin | Updated: September 25, 2015 01:08 IST

६७ पैशापेक्षा कमी-जास्त पैसेवारी जाहीर करण्याच्या सूचना घेतल्या मागे.

अकोला: खरीप पिकांची ६७ पैशांपेक्षा कमी किंवा जास्त नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्याबाबत यापूर्वी शासनामार्फत देण्यात आलेल्या सूचना मागे घेण्यात आल्या. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच ५0 पैशांपेक्षा कमी किंवा जास्त अशी जिल्ह्यातील खरीप पिकांची नरजअंदाज पैसेवारी पुन्हा जाहीर करण्यात येणार आहे. दरवर्षी खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ३0 सप्टेंबर रोजी जाहीर केली जाते; मात्र यावर्षी त्यापूर्वीच खरीप पिकांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. शासनाच्या १६ सप्टेंबर रोजीच्या पत्रानुसार खरीप पिकांची ६७ पैशांपेक्षा कमी किंवा जास्त नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अकोला जिल्ह्यातल्या सातही तालुक्यातील एकूण १ हजार ९ महसुली गावांपैकी लागवडीयोग्य ९९७ गावांची खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी सरासरी ५३ पैसे म्हणजेच ६७ पैशांपेक्षा कमी असल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी शनिवार, १९ सप्टेंबर रोजी जाहीर केले होते. त्यानंतर ६७ पैशांपेक्षा कमी किंवा जास्त नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्याबाबत १६ सप्टेंबर रोजी देण्यात आलेल्या सूचना मागे घेऊन, पूर्वीप्रमाणेच ५0 पैशांपेक्षा कमी किंवा जास्त नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्याचा निर्णय २३ सप्टेंबरला शासनामार्फत घेण्यात आल्याचा आदेश गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. त्यामुळे यापूर्वी गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील जाहीर करण्यात आलेली खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी सुधारित करून, ३0 सप्टेंबर रोजी पुन्हा जाहीर करण्यात येणार आहे. अशी काढली जाणार पुन्हा नजरअंदाज पैसेवारी! ५0 पैशांपेक्षा कमी किंवा त्यापेक्षा जास्त नजरअंदाज पैसेवारी काढण्यासाठी पुन्हा एकदा महसूल अधिकार्‍यांना रँडम पद्धतीने प्लॉट निवडून, प्रमुख पिकांकरिता प्रत्येक गावामध्ये किमान १२ भूखंड निवडून, त्याची प्रत्यक्ष पाहणी करून, त्याद्वारे खरीप पिकांच्या पैसेवारीचा अंदाज काढण्यात यावा, आणि त्यानुसार नजरअंदाज पैसेवारी जाहीर केल्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही शासनाच्या महसूल विभागामार्फत जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्या. सुधारित पैसेवारीचे प्रस्ताव सादर करा; जिल्हाधिकार्‍यांचा आदेश! जिल्ह्यातील खरीप पिकांच्या सुधारित पैसेवारीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी आणि सातही तहसीलदारांना दिले.