शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

केंद्राच्या धर्तीवर राज्यातही नीती आयोगाची गरज!

By admin | Updated: March 4, 2016 01:59 IST

संजय खडक्कार यांचा राज्य शासनाला सल्ला.

मनोज भिवगडे/अकोलाकेंद्र शासनाने योजना आयोग बंद करून त्या जागी 'नॅशनल इंस्टिट्युशन फॉर ट्रान्सफार्मिंग इंडिया' (नीती) आयोगाची स्थापना केली. केंद्राप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही योजना आयोग बंद केला; पण त्यासाठी पर्यायी व्यवस्थाच करण्यात आली नाही. त्यामुळे अर्थसंकल्प तयार करताना राज्य शासनाला समतोल विकासाच्या दृष्टिकोनातून योजना देणारी व्यवस्थाच राज्यात उपलब्ध नाही. ही व्यवस्था निर्माण करण्यासाठी केंद्राप्रमाणेच राज्यातही 'महाराष्ट्र इंस्टिट्युशन फॉर ट्रान्सफार्मिंग स्टेट'(मीटस्) आयोग सुरू करावा, असा सल्ला विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य संजय खडक्कार यांनी राज्य शासनाला दिला आहे.राष्ट्रपतींच्या आदेशाने ९ मार्च १९९४ रोजी राज्यपालांनी महाराष्ट्रात तीन वैधानिक विकास मंडळांची स्थापना केली होती. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या विभागांच्या गरजा, उपलब्ध संसाधने आणि विविध क्षेत्रातील समतोल विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून ३0 एप्रिल १९९४ पासून या तीनही वैधानिक विकास मंडळांचे काम सुरू झाले होते. २00६ मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने वैधानिक विकास मंडळांच्या कामकाजाचा आणि त्यांच्या उपयुक्ततेचा आढावा घेण्यासाठी योजना आयोगाच्या सल्लागार आदर्श मिसरा यांच्या नेतृत्वात एक समिती गठित केली होती. या समितीने विदर्भ आणि मराठवाड्यातील विकासाचा समतोल साधण्यात वैधानिक विकास मंडळे सक्षम नसल्याचे निरीक्षण नोंदविले होते. ती केवळ सल्लागार मंडळे बनली असून योजना, वित्त आणि संबंधित विभागाकडून वैधानिक विकास मंडळाचा सल्ला प्रत्यक्षात अंमलात आणला जात नसल्याने विकासाचा असमतोल वाढत असल्याचे मिसरा समितीने सांगितले होते. वैधानिक विकास मंडळांना योजना आखणे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्यक्षात सहभागी करून घेण्यात आले नाही. त्यामुळे ही मंडळे ज्या उद्देशाने स्थापन केली होती, तो उद्देश पूर्ण होऊ शकला नाही आणि विकासाचा असमतोल वाढत गेला. वैधानिक विकास मंडळांचे काम प्रभावी होण्यासाठी या समितीने काही सूचना केल्या होत्या. या सूचनांची दखल घेत राज्यपालांनी ५ सप्टेंबर २0११ रोजी विभागीय आणि जिल्हा पातळीवर विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्याची जबाबदारी वैधानिक विकास मंडळांवर सोपविली होती. ही जबाबदारी पार पाडण्याकडे दुर्लक्ष झाल्याने संपूर्ण विदर्भाच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयारच होऊ शकली नाही. ११ जिल्ह्यांपैकी यवतमाळ आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांचे अहवाल तयार होऊ शकलेत. दरम्यानच्या काळात विकासाचा असमतोल दूर करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाकडून डॉ. विजय केळकर यांच्या नेतृत्वात समिती गठित करण्यात आली. या समितीने २0१३-१४ मध्ये त्यांचा अहवाल सादर केला. या समितीने वैधानिक विकास मंडळाच्या पुनर्रचनेची शिफारस केली होती. विभागीय आणि जिल्हा स्तरासोबतच ब्लॉक स्तरावर स्रोतांचा विकास करण्यावर भर देण्याची शिफारस करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने वैधानिक विकास मंडळाचे अधिकार क्षेत्र वाढवून त्यांना आर्थिक आणि प्रशासकीयदृष्ट्या बळकट करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील एक प्रतिनिधी मंडळावर असावा, अशी शिफारस करण्यात आली होती. ह्यडाटा बँकह्ण तयार करून स्रोतांची माहिती संकलित करीत विभागाच्या गरजा आणि मागणीनुसार विकास योजना आखणे शक्य होईल. याशिवाय प्रत्येक विभागाचा दीर्घकालीन आणि अल्पावधीचा विकास आराखडा तयार करावा. केवळ आराखडा तयार करून भागणार नाही तर, दरवर्षी त्याचा आढावा घेतला पाहिजे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यावर भर देण्याची गरज आहे, त्याचाही विचार करण्यात यावा. याकरिता योजना आयोग बंद करण्यात आल्यानंतर केंद्राप्रमाणे ह्यनीतीह्ण आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात ह्यमीटस्ह्ण आयोग स्थापन करून त्याचा उपयोग राज्याचे नियोजन आणि बजेटला सहकार्य करण्यासाठी करून घ्यावा, असा सल्ला डॉ. खडक्कार यांनी राज्यपालांच्या माध्यमातून राज्य शासनाला दिला आहे. योजनांचा अभ्यास करून त्यावर कार्यवाही व्हावी!जिल्हा नियोजन समितीद्वारे विकासाचे चांगले काम होत असले तरी त्यांना र्मयादा आहे. त्यासाठी वैधानिक विकास मंडळ आणि जिल्हा नियोजन समितीमध्ये समन्वय ठेवणारी सक्षम यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी वैधानिक विकास मंडळाने राज्यपालांना विविध विकास कामांबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर अभ्यास गटाकडून त्यावर विचार होऊन योजनावर अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठवून त्यावर अंमलबजावणी होईल या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे डॉ. खडक्कार यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रकात म्हटले असून, यावर योग्य ती अंमलबजावणी करून समतोल विकास राखण्यासाठी ठोस भूमिका घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.