शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

पाेलिसांची मदत हवी? आता डायल करा ११२, दहाव्या मिनिटाला पाेलीस मदत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:24 IST

जिल्ह्यात एकूण २३ पोलीस ठाणी आहेत. त्यात ११२ अधिकारी व २३२५ अंमलदार कार्यरत आहेत. दरम्यान, या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील ...

जिल्ह्यात एकूण २३ पोलीस ठाणी आहेत. त्यात ११२ अधिकारी व २३२५ अंमलदार कार्यरत आहेत. दरम्यान, या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत हवी असल्यास त्यांना १६ सप्टेंबरपासून ११२ हा हेल्पलाईन क्रमांक डायल करावा लागणार आहे. विशिष्ट यंत्रणेच्या सहाय्याने एका ठिकाणी फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा फोन कोठून आला, हे संबंधितांना कळणार आहे. त्यानंतर तेथील पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाइन, चाइल्ड हेल्पलाइन यांना एकाचवेळी त्या कॉलची माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊ शकतील. आपत्कालीन प्रतिसाद सहाय्य प्रणाली (ईआरएसएस) निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा अकाेला जिल्ह्यातील पाेलीस १६ सप्टेंबर राेजी शुभारंभ करणार असून नागरिकांना आता १०० ऐवजी ११२ या क्रमांकावर मदत मागावी लागणार आहे़

......................

काॅल येताच कळणार लोकेशन

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, कुठलीही घटना घडल्यास पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचावेत, यासाठी ११२ हा हेल्पलाईन क्रमांक १६ सप्टेंबर राेजी कार्यान्वित केला जाणार आहे. या क्रमांकावरून काॅल येताच विशेष यंत्रणेच्या मदतीने व वाहनांवरील जीपीएसच्या सहाय्याने काॅल नेमका कोठून आला, याचे लोकेशन कळण्याची व्यवस्था उभी केली जात आहे. त्यामुळे पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचणे, आरोपी फरार होणे यासह इतरही बाबींना आळा बसणार आहे.

...................

३१ चारचाकी, ४८ दुचाकी वाहने

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अकोला पोलीस दलात ९ चारचाकी वाहने दाखल झाली हाेती. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी ३० चारचाकी वाहने व ४८ दुचाकी वाहने देण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केल्यानंतर आता ३१ चारचाकी व ४८ दुचाकी अद्ययावत वाहने मिळाली असून पोलिसांना आपले कर्तव्य अधिक गतीने बजावण्यासाठी मदत होणार आहे.

....................

५५ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

राज्यातील इतर जिल्ह्यांसह अकोला जिल्ह्याचेही सध्या ‘जिओ टॅगिंग’ केले जात आहे. त्याचबरोबर ‘सेंट्रलाइज कंट्रोल रूम’ला फोन आल्यावर कशाप्रकारे प्रतिसाद द्यायचा, स्थानिक कंट्रोल रूमला फोन आल्यावर काय प्रक्रिया राबवायची याबाबत प्रशिक्षण प्रणाली निश्चित करण्यात आली आहे. त्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. अकोला जिल्हा पोलीस दलातील दोन अधिकारी १८ वायरलेसचे कर्मचारी व इतर विभागाचे २० पोलीस कर्मचारी अशा प्रकारे एकूण ५५ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले आहे

.......................

गेल्या काही वर्षांत पोलीस दल अधिक ‘हायटेक’ करण्याचे प्रयत्न शासन स्तरावरून सातत्याने केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कुठेही घटना घडल्यास त्याठिकाणी पोलीस तत्काळ पोहोचावेत, यासाठी ११२ हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्याची प्रक्रिया गतीने करण्यात आली़ अकाेल्यात हा प्रकल्प १६ सप्टेंबरपासून कार्यान्वीत करण्यात येणार आहे़

- जी. श्रीधर

जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला

............